किमान तापमान : 24.82° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा ताफा अद्यावत,
नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – भारतीय हवाई दलाची उत्तरलाई (बाडमेर) हवाई तळावर स्थित क्रमांक ४ ची स्क्वाड्रन (ऊरिअल्स) मिग-२१ मधून सुखोई -३० एमकेआयमध्ये रूपांतरित करण्यात आली असून १९६६ पासून मिग-२१ चे परिचालन करणार्या स्क्वाड्रनचा इतिहासातील निर्णायक क्षण आहे. मिग -२१ हे भारतीय हवाई दलाच्या सेवेतील पहिले स्वनातीत(सुपरसॉनिक) लढाऊ विमान आहे आणि १९६३ मध्ये हवाई दलात या विमानाचा समावेश झाला होता, तेव्हापासून सर्व मोठ्या युद्धांमध्ये या विमानाचा सहभाग होता . हा बदल भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि त्याच वेळी देशाच्या अवकाशाचे रक्षण करण्यासाठी अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
३० ऑक्टोबर २३ रोजी उत्तरलाई येथील हवाई तळावर आयोजित एका समारंभाद्वारे नवीन विमानांचा औपचारिक समावेश करण्यात आला. या समारंभात मिग -२१ आणि सुखोई -३० एमकेआय या विमानांनी एकत्रित हवाई कसरती केल्या. या माध्यमातून मिग-२१ विमानांच्या स्क्वाड्रनने शेवटचे उड्डाण केले.या समारंभाला विविध लष्करी आणि नागरी मान्यवरांची उपस्थिती होती. भारतीय हवाई दल आता मिग-२१ विमानांच्या केवळ दोन स्क्वाड्रनचे परिचालन करेल, हे या स्क्वाड्रनचे सुखोई -३० एमकेआय मध्ये रूपांतर सूचित करते. भारतीय हवाई दल २०२५ पर्यंत मिग-२१ विमानांचा वापर टप्प्याटप्प्याने थांबवण्यासाठी वचनबद्ध आहे.