|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » राष्ट्रीय, संसद » मोदी मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

मोदी मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

नवी दिल्ली, (१० जुन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. ही बैठक संध्याकाळी पाच वाजता होऊ शकते. सूत्रांनी सांगितले की, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात समाविष्ट लोकांसाठी डिनरचे आयोजन केले आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या तिसर्‍या कार्यकाळात विकासाला नवी गती देण्यासाठी अनुभवी नेते आणि मंत्र्यांवर विश्वास व्यक्त केला आहे. ७२ सदस्यीय मंत्रिमंडळातील निम्म्याहून अधिक मंत्री यापूर्वी केंद्रात मंत्री आणि तीन किंवा त्याहून अधिक वेळा खासदार राहिले आहेत. त्याचप्रमाणे मंत्रिपरिषदेत सर्व प्रदेश, वर्ग आणि समुदायांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ४७ मंत्री ओबीसी, एससी, एसटी आणि अल्पसंख्याक समाजाचे आहेत. मोदी ३.० मध्ये ७२ पैकी ४३ मंत्री आहेत जे तीन किंवा अधिक वेळा खासदार झाले आहेत. तर ३९ मंत्र्यांना यापूर्वी केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. एवढेच नाही तर मंत्र्यांमध्ये सर्बानंद सोनेवाल, मनोहर लाल, शिवराज सिंह चौहान, एचडी कुमारस्वामी आणि जीतन राम मांझी यांसारखे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले अनुभवी चेहरेही आहेत. तसेच, पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या सर्व मंत्र्यांना विनम्र राहण्याचा सल्ला दिला, कारण सामान्य लोकांना हे आवडते. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेशी कधीही तडजोड करू नका, असा सल्लाही मोदींनी दिला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता म्हणून १७ हजार कोटी रुपये जारी केले आहेत. बरेच दिवस शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते.पीएम मोदींचा शेतकर्‍यांसाठी पहिला निर्णय, २० हजार कोटी जारी.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या १७ व्या हप्त्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे.
तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ९ कोटींहून अधिक शेतकर्‍यांना मोठी भेट दिली आहे. झच् किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता म्हणून २० हजार कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. बरेच दिवस शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पीएम मोदी म्हणाले की, आमचे सरकार शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच पहिली फाइल शेतकरी हिताची होती. आम्हाला येणार्‍या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे.
तुम्हाला वर्षाला ६००० रुपये मिळतात
२०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पात्र शेतकर्‍यांना वार्षिक ६,००० रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते. ही रक्कम दर चार महिन्यांनी २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरीत केली जाते, जी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अंतरिम अर्थसंकल्पानुसार, सरकारने कृषी मंत्रालयासाठी २०२४-२५ साठी १.२७ लाख कोटी रुपयांचे बजेट दिले आहे, जे आर्थिक २०२३-२४ च्या अर्थसंकल्पापेक्षा किंचित जास्त आहे. जुलै २०२४ मध्ये पूर्ण अर्थसंकल्प जाहीर होण्याची शक्यता आहे.
१६ वा हप्ता २८ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला
पीएम-किसान योजना: ही योजना देशातील सर्व जमीनधारक शेतकर्‍यांच्या कुटुंबांना शेती आणि संबंधित काम तसेच त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. ही योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती, परंतु ती डिसेंबर २०१८ पासून लागू करण्यात आली. यापूर्वी, देशाच्या पंतप्रधानांनी २८ फेब्रुवारी रोजी पीएम किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता जारी केला होता. १६ व्या हप्त्यात ९ कोटींहून अधिक शेतकर्‍यांना २१ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जारी करण्यात आली.

Posted by : | on : 10 Jun 2024
Filed under : राष्ट्रीय, संसद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g