किमान तापमान : 29.33° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.33° से.
27.34°से. - 30.76°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशयूट्यूबची सीईओ सुसान वोजिकी देणार राजीनामा,
नवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी ) – भारतीय-अमेरिकन नील मोहन यूट्यूबच्या नवीन सीईओ बनणार आहेत. स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटी या जगातील टॉप ३ विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आहे. नील मोहन हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत आणि त्यांनी २००५ मध्ये स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आहे. नील मोहन हे यूट्यूबच्या सीईओ सुसान वोजिकीची जागा घेतील. सीईओ म्हणून त्यांना करोडो रुपये पगार मिळणार आहे. नील मोहन हे यापूर्वी यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी होते.
भारतीय-अमेरिकन नील मोहन यांनी यापूर्वी यूट्यूब चे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून काम केले आहे. नील मोहन २००८ मध्ये गुगलमध्ये रुजू झाले. गुगल ही यूट्यूब ची मालकी कंपनी आहे. मोहन आणि वोजिकी यांनी जवळपास १५ वर्षे अनेक प्रकल्पांवर एकत्र काम केले. र्ॄेीलश्रशउश्रळलज्ञ संपादनाचा एक भाग म्हणून ते २००७ मध्ये गुगल मध्ये सामील झाले आणि नंतर ते डिस्प्ले आणि व्हिडिओ जाहिरातींचे वरिष्ठ उपाध्यक्ष झाले. २०१५ मध्ये, त्यांची यूट्यूब चे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. नील मोहन यांना युट्युबचे नवे सीईओ म्हणून करोडो रुपये पगार मिळणार आहे. याआधी युट्युबच्या सीईओ म्हणून सुसान वोजिकी यांनाही दरवर्षी इतकी रक्कम मिळत होती. नील मोहन यांची अंदाजे एकूण मालमत्ता २८९८.३५ कोटी रुपये आहे.
सन १९९६ मध्ये, त्यांनी युनायटेड स्टेट्समधील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. यानंतर २००५ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले. यूट्यूब व्यतिरिक्त, त्यांनी कपडे आणि फॅशन कंपनी स्टिच फिक्सचे बोर्ड डायरेक्टर म्हणूनही काम केले आहे. त्यांनी २३रपवचश या जैवतंत्रज्ञान संशोधन कंपनीच्या संचालक मंडळावर काम केले आहे. मोहनने गुगल सारख्या नामांकित कंपनीसाठी काम केले आणि त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टमध्ये एक लहान इंटर्नशिप पूर्ण केली. त्यांनी गुगल मधील प्रदर्शन आणि व्हिडिओ जाहिरात विभागाचे निरीक्षण केले, जेथे ते कंपनीच्या यूट्यूब, गुगल प्रदर्शन नेटवर्क, अवडशपीश, अवचेल आणि र्ॄेीलश्रशउश्रळलज्ञ जाहिरात तंत्रज्ञान उत्पादन सेवांचे प्रभारी होते.
यूट्यूबची सीईओ देणार राजीनामा
वॉशिंग्टन – यूट्यूब सीईओ सुसान वोजिकी यांनी राजीनामा जाहीर केला असून ती गेली नऊ वर्षे अल्फाबेटच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर (यूट्यूब) काम करत होती. दरम्यान भारतीय-अमेरिकन नील मोहन वोजिकी यांच्यावर यूट्यूबची जबाबदारी स्वीकारतील. सध्या तो यूट्यूबवर प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे. २०२२ मध्ये, यूट्यूब ने जाहिरातींमधून २९.२ बिलियन कमावले होते, जे त्याच्या मूळ कंपनी अल्फाबेटच्या एकूण कमाईच्या १०% पेक्षा जास्त होते. गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सेर्गे ब्रिन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, गुगलला महान बनवण्यात सुझनचे उत्कृष्ट योगदान आहे.
अमेरिकन-भारतीय वंशाचे नील मोहन नोव्हेंबर २०१५ मध्ये यूट्यूब मध्ये सामील झाले. नील मोहनच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून असे दिसून येते की त्याने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे. यानंतर त्यांनी एक्स्चेंज कंपनीतून करिअरला सुरुवात केली. सध्या यूट्यूब मध्ये उत्पादन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नील मोहन आता अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत काम करतील. नील मोहन आणि त्यांची पत्नी हेमा सरीम मोहन. पिचाई हे देखील भारतीय वंशाचे आहेत. तेव्हापासून, जगातील अनेक टेक कंपन्यांमध्ये मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, अडोबचे सीईओ शंतनू नारायण आणि आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा यांच्यासह भारतीय वंशाचे सीईओ आहेत.