किमान तापमान : 27.5° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.37 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
26.31°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश25.23°से. - 30.12°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.06°से. - 29.91°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.04°से. - 29.96°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.7°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.2°से. - 28.88°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर कुछ बादलअयोध्या, (२२ जानेवारी) – रामललाच्या दर्शनाची शतकानुशतकांची प्रतीक्षा अखेर आज संपली. रामललाची पहिली प्रतिमा पाहताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बालखंड रामचरितमानसमध्ये रामललाचे वर्णन केल्याप्रमाणे रामललाच्या मूर्तीची सजावट केली जात आहे. रामललाच्या चरणी वज्र, ध्वज आणि अंकुश ही प्रतीके विभूषित आहेत. कमरेवर कमरपट्टा आणि पोटावर त्रिवली आहे. रामललाचे विशाल हात दागिन्यांनी सजलेले आहेत. रामललाच्या छातीवर वाघाच्या पंजाची अतिशय अनोखी छटा आहे. छाती रत्नांनी जडलेल्या मोत्याच्या हाराने सजलेली आहे.
आरतीवेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि पाहुण्यांच्या हातात घंटा
अयोध्या नगरीमध्ये श्री रामललाची प्राण प्रतिष्ठा होत असताना आरतीच्या वेळी लष्कराच्या हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. प्राण प्रतिष्ठेच्यावेळी रामजन्मभूमी मंदिरात आरती करताना ३० कलाकार भारतीय वाद्य वाजवत होते. सर्व पाहुण्यांना घंटा दिली गेली होती, जी ते आरतीच्या वेळी वाजवीत होते.
सर्व वादकांनी सामुहिकपणे आपली वाद्ये वाजवली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी झाले. या ऐतिहासिक सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक पंथांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विशेष मेळाव्याला संबोधित केले.