किमान तापमान : 24.82° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादललडाख, २४ नोव्हेंबर – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लडाखच्या पूर्व सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव असतानाच, चीन आता पश्चिम सीमेवर आणखी काही लढाऊ विमाने तैनात करण्याच्या तयारीत आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी मारा करण्याची या विमानांची क्षमता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चीनच्या प्रसारमाध्यमांनी आज मंगळवारी याबाबतचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केले आहे. जे-१६ जातीच्या लढाऊ विमानांचा यासाठी वापर केला जाणार असून, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न कमांडने या विमानांच्या तैनातीची तयारी सुरू केली असल्याचे यात म्हटले आहे.
भारतीय लष्कर आणि हवाई दलाने अत्याधुनिक क्षेत्रणास्त्रे आणि रडगाडे सीमेवरील बहुतांश भागांमध्ये तैनात केली असून, भुयारी व्यूवरचनाही तयार केली असल्याने, चीननेही आपली सज्जता वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या भागाला जोडण्यासाठी चीनच्या सैनिकांनी एका पुलाचेही बांधकाम केले आहे.
मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पूर्व आणि पश्चिम सीमेवरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनयिक पातळीवर आतापर्यंत चर्चेच्या आठ फेर्या पूर्ण झाल्या आहेत. या सर्वच फेर्यांमध्ये दोन्ही देशांनी सीमेवर शांतता कायम राखण्यावर भर दिला असला, तरी दोन्ही देशांनी स्वत:ची सज्जताही वाढवली आहे.