किमान तापमान : 24.72° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 6.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलकेवाडिया, २५ नोव्हेंबर – लोकनियुक्त प्रतिनिधींकडून नागरिकांना शिस्तीची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज बुधवारी केले. लोकनियुक्त प्रतिनिधींनी संसदेतील सुदृढ चर्चेत सहभागी झाले पाहिजे आणि विधानसभा तसेच सदनातील चर्चेवेळी असंसदीय भाषेचा वापर करू नये, असेही त्यांनी सांगितले.
ज्या नागरिकांनी निवडून दिले त्यांच्या भावना लोकप्रतिनिधी सदनामध्ये असंसदीय भाषेचा वापर करून आणि बेशिस्त दाखवून दुखावतात, असे कोविंद यांनी गुजरातमधील केवडिया गावात आयोजित केलेल्या ६० व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सांगितले.
लोकप्रतिनिधींनी लोकशाही मूल्यांचे पालन करण्याची अपेक्षा आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, हे लोकनियुक्त प्रतिनिधी आणि लोकशाही संस्थांसमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. लोकप्रतिनिधींनी संसदीय नियमांचे पालन करावे, असी नागरिकांना अपेक्षा आहे. लोकप्रतिनिधींनी असंसदीय भाषेचा वापर केल्यास तसेच संसदेत किंवा विधानसभेत त्यांनी बेशिस्त वर्तन केल्यास लोकांच्या भावना दुखावतात, असे त्यांनी सांगितले. सभागृहातील चर्चेवेळी अनावश्यक कडवटपणा निर्माण होऊ नये आणि सुदृढ चर्चा व्हावी, याची काळजी पीठासीन अधिकार्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. संसदीय लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षासोबत विरोधकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे सामंजस्य, सहकार्य आणि त्यांच्या अर्थपूर्ण विचारांची देवाणघेवाण व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
घटनेपेक्षा कुणीही मोठे नाही ः व्यंकय्या नायडू
देशात आपणच सर्वोच्च आहोत, अशी भावना कुणीही ठेवू नये. घटनेपेक्षा कुणीही मोठे नाही, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज बुधवारी केले. आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, अशी छाप काही न्यायालयीन निकालांच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.