किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलडासना देवी मंदिरात घेतली दीक्षा,
गाझियाबाद, ६ डिसेंबर – उत्तरप्रदेशच्या शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आज सोमवारी हिंदू धर्म स्वीकारला. हे धर्मांतर नव्हे. मला इस्लाममधून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे पुढे कोणता धर्म स्वीकारायचा, ही माझी मर्जी आहे. सनातन धर्म हा जगातील सर्वांत पहिला धर्म असून, त्यात मानवतेशी निगडित असंख्य चांगल्या गोष्टी आहेत, असे रिझवी यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्यावर सांगितले.
उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद गिरी यांनी रिझवी यांना सनातन धर्माची दीक्षा दिली. यासाठी मंदिरात अनेक विधी पार पडले. आम्ही इस्लामला धर्म मानत नाही. इस्लाम हा धर्म नाही तर, एक दहशतवादी गट आहे, जो १४०० वर्षांपूर्वी अरबमध्ये तयार झाला होता. दर शुक्रवारी नमाजानंतर माझे डोके उडवण्यास सांगितले जाते. मला मुस्लिम मानण्यास त्यांना कमीपणा वाटतो. त्यामुळे मी सनातन धर्म स्वीकारत आहे, असे रिझवी यांनी सांगितले.
मृत्युनंतर हिंदू परंपरेप्रमाणे माझ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशी इच्छा त्यांनी मृत्युपत्रात व्यक्त केली आहे. रिझवी यांनी कुराणमधून २६ आयत हटवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली होती. कुराणमधील ही आयत हिंसेला बळ देतात, असा त्यांचा दावा होता. त्यावेळी शिया आणि सुन्नीच्या मौलवींसह अनेक मुस्लिमांनी रिझवींचा निषेध करीत, त्यांना इस्लाम धर्मातून बेदखल करण्याची मागणी केली होती. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रिझवी यांनी मदरशांवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांनी मदरशांमध्ये दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचा असा आरोप केला.
वसीम रिझवी झाले नारायणसिंह त्यागी
वसीम रिझवी आता नव्या ओळखीसह वावरणार आहेत. त्यांचे नवे नाव नारायणसिंह त्यागी असे झाले आहे. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपले नावही बदलले आहे.