किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, [१ सप्टेंबर] – गेल्या काही दिवसांत व्हॉट्स ऍपच्या युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटस ऍप जगभरातील आपल्या साठ कोटींपेक्षा जास्त युझर्ससाठी मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणणार आहे. त्यात ५ कोटी भारतीयांचाही समावेश आहे. या ऍपच्या बदललेल्या ‘इंटरफेस’ची काही छायाचित्रे बाहेर आली आहेत. त्यावरून कंपनीच्या पुढील हालचालीचा अंदाज बांधण्यात येत आहे. ‘व्हॉटस ऍप’चा मालकी हक्क सध्या ‘फेसबुक’कडे आहे.
नव्या ‘इंटरफेस’वरून कंपनी आपल्या ग्राहकांना मोफत ‘व्हॉईस कॉलिंग’ची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या ऍपच्या इंटरफेसमध्ये विविध भाषांमध्ये भाषांतराची सुविधा देण्यात आली असल्याचे हे संकेत आहेत. ‘व्हॉटस ऍप’च्या अत्याधुनिक व्हर्जनमध्येही भाषांतराचा पर्याय देण्यात आल्यामुळे ‘व्हॉईस कॉलिंग’ सुरू होण्याच्या संकल्पनेला बळ मिळाले आहे. ‘फेसबुक’ने विकत घेतल्यानंतर ‘व्हॉट्स ऍप’च्या युझर्समध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, मोफत ‘व्हॉईस कॉलिंग’ सुरू करण्यावर फेसबुकवरही काहीही माहिती देण्यात आलेली नाही.