किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.71° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.71° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०२ मार्च) – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दक्षिण आफ्रिकेतील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर मोहम्मद गौस नियाझी याला अटक केली आहे. एजन्सीने नियाझीवर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे प्रमुख नेता मोहम्मद गौस नियाझी याच्यावर २०१६ मध्ये बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रुद्रेश यांची हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्ह्यानंतर नियाझी वेगवेगळ्या देशांमध्ये लपून राहिला आणि गेली ८ वर्षे चकमा देण्यात यशस्वी ठरला. गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (गुजरात एटीएस) नियाझीच्या कारवायांचा मागोवा घेण्याचे काम हाती घेतले आणि अखेरीस केंद्रीय एजन्सीसोबत महत्त्वपूर्ण माहिती सामायिक केली. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या अधिकार्यांना सतर्क करण्यात आले होते.
२०१६ मध्ये बेंगळुरूच्या शिवाजीनगर भागात आरएसएस नेता रुद्रेश यांची हत्या करण्यात आली होती. रुद्रेश बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतत होते. रुद्रेश यांना ठार मारण्यासाठी घुसलेल्या दहशतवाद्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रुद्रेश यांचा जागीच मृत्य झाला होता. रुद्रेश यांच्या हत्येतील नियाझीच्या सहभागाने संपूर्ण देश हादरला होता. या हत्येनंतर कायद्याची अंमलबजावणी करणार्या यंत्रणांनी नियाझीचा पाठलाग सुरूच ठेवला. नियाझीला दक्षिण आफ्रिकेत ताब्यात घेतल्यानंतर, प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आणि फरारीला आता भारतात आणण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला सध्या मुंबईत आणण्यात आले आहे जिथे त्याला संघाच्या नेत्याच्या हत्येतील कथित सहभागाबद्दल खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.