किमान तापमान : 25.79° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.14°से. - 26.13°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १२ जून – केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता उच्चस्तरीय सूत्रांनी वर्तवली आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बैठकांच्या सत्रांनंतर या चर्चेला वेग आला आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा जोर आता कमी झाला आहे आणि पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी यापेक्षा दुसरी चांगली वेळ असू शकत नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे काहीसे लांबले, तरी अधिवेशनाआधी हा विस्तार होईल, अशी दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदासाठी अनेक जण प्रतीक्षेत आहेत. त्यात कॉंग्रेसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचे नावही आघाडीवर आहे. याशिवाय सुशीलकुमार मोदी, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांचाही या विस्तारात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहे, पण कोरोनाची लाट भयानक वेगाने वाढली. आता ही लाट ओसरत आहे.
केंद्रात सध्या चार पदे रिक्त आहेत, शिवसेना, अकाली हे दोन मित्रपक्ष बाहेर पडल्याने आणि रामविलास पासवान यांचे निधन झाल्याने तीन कॅबिनेट मंत्रिपद आणि सुरेश आंगडी यांच्या निधनामुळे एक राज्यमंत्रिपद रिक्त आहे. मोदी सरकार दुसर्यांदा सत्तेत आल्यानंतर एकदाही विस्तार झालेला नाही. त्यातच पुढील वर्षी उत्तरप्रदेशसह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळात काही बदल करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सूत्रांचे मत आहे. महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. या पृष्ठभूमीवर भाजपा एखादा मराठा चेहरा निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रादेशिक संतुलनासाठी उत्तर महाराष्ट्राचाही विचार होऊ शकतो. एकनाथ खडसे यांच्या जाण्याने भाजपाला तिथे पक्ष बळकट करण्याची आवश्यकता आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मराठा असल्याने, तसेच शिवसेनेला शह देण्यासाठी उत्तम पर्याय असल्याने त्यांच्याही नावाचीही चर्चा आहे.