किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– पाश्र्वनाथ दिगंबर जैन मंदिराला भेट,
– संघ स्वयंसेवकांचे विविध जैन मंदिरांत अभिवादन,
नागपूर, (१४ नोव्हेंबर) – भगवान महावीर यांच्या निर्वाणास २५५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी इतवारीमधील श्री पाश्र्वनाथ दिगंबर जैन (मोठे) मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले. भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटीचे राष्ट्रीय महामंत्री संतोष जैन, मंदिराचे अध्यक्ष उदय जैन, महानगर संघचालक राजेश लोया आदींसह संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतर भागांतीलही जैन मंदिरांमध्येही जाऊन संघ स्वयंसेवकांनी भगवान महावीरांना अभिवादन करीत दर्शन व मुनींचे आशीर्वचन घेतले.
दादावाडी जैन मंदिर
उत्तर नागपुरातील वैशालीनगरातील दादावाडी जैन मंदिरात मुनीश्री विनम्रसागर महाराज, शासनरत्न सागर महाराज, रा. स्व. संघाचे बिनाकी भागाचे संघचालक डॉ. सत्यप्रकाश मंगतानी, विदर्भ प्रांत व्यवस्था प्रमुख मोहन अग्निहोत्री आदींसह बिनाकी भागातील स्वयंसेवक उपस्थित होते. मुनीश्री विनम्रसागर महाराज यांनी प्रवचनात सहानुभूती व समानुभूती यामधील फरक समजावून सांगत, लहान-लहान उदाहरणांद्वारे मनुष्याला हिंसक वृत्ती कशी त्यागता येईल, हे सांगितले.
पारडी जैन मंदिर
पारडी जैन मंदिरातही आज सकाळी स्वयंसेवकांनी अभिवादन केले. विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख प्रशांत दाणी, स्वरूपचंद लुणावत, नगर संघचालक राजेंद्र कापसे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर जैन मंदिर
सदर, गिट्टीखदान भागातील स्वयंसेवकांनी सदर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांना अभिवादन केले. नागपुरातील जैन समाजाचे अध्यक्ष अरुण जैन व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तुलसीनगर जैन मंदिर
रा. स्व. संघाच्या लालगंज भागातील स्वयंसेवकांनी तुलसीनगरातील भगवान शांतिनाथ दिगंबर जैन परवार मंदिराच्या जिनालयात जाऊन दर्शन घेत मंदिराची ओळख आणि वैशिष्ट्य जाणून घेतले. रा. स्व. संघाचे अ. भा. व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, महानगर कार्यवाह उदय वानखेडे, भाग संघचालक अरविंद आवळे, समिती अध्यक्ष अरविंद जैन, उपाध्यक्ष संजय जैन यावेळी उपस्थित होते. दीप प्रज्वलनानंतर मंगेश भेंडे यांनी जैन धर्म आणि महावीरांच्या पंच विचारांबाबत माहिती दिली.