किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– चलनाची बचत, अर्थव्यवस्थेला फायदा,
नवी दिल्ली, (२६ नोव्हेंबर) – केंद्र सरकारने सीएनजी आणि पीएनजीमध्ये बायोगॅसचे मिश्रण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या पावलामुळं अर्थव्यवस्थेला फायदा होणार असल्याचे मत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केलं. कंप्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) मध्ये बायोगॅस मिसळणे बंधनकारक असेल, असे सरकारने म्हटले आहे. याशिवाय कॉम्प्रेस्ड बायो गॅसचे उत्पादन आणि वापरही वाढेल. या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले. देशात जैव इंधनाला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे मानले जाते.
केंद्रीय भांडार संस्था बायो गॅस मिश्रणाच्या प्रणालीवर लक्ष ठेवेल आणि हा नियम सर्वत्र पाळला जाईल याची काळजी घेईल, असा निर्णय राष्ट्रीय जैवइंधन समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कृषी विभाग आणि अन्न व सार्वजनिक वितरण विभागानेही याला सहमती दर्शवली आहे. ही नवीन प्रणाली २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून सुरू होईल. अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, वाहने आणि घरांमध्ये त्याचा वापर एक टक्का मिश्रणाने सुरू केला जाईल. त्यानंतर २०२८ पर्यंत ते ५ टक्के करण्यात येईल, अशी माहिती हरदीप सिंग पुरी यांनी दिली. बायो गॅसचा वापर वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरेल, असं सांगताना हरदीप सिंग पुरी म्हणाले की, यामुळं बायोगॅसचे उत्पादन वाढेल आणि देशाची एलएनजी आयात कमी होईल.
ते पुढं म्हणाले की, यामुळं देशातील जनतेला पैसा तर मिळेलच शिवाय सरकारला परकीय चलन वाचवण्यासही मदत होईल. निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या उद्दिष्टाच्या दिशेने सरकारचे हे एक मजबूत पाऊल आहे. या निर्णयामुळं २०२८-२९ पर्यंत सुमारे ७५० बायोगॅस प्रकल्प बांधले जातील. तसेच ३७,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन वाढवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती पुरी यांनी दिली. सरकारने वर्ष २०२७ पर्यंत देशांतर्गत उड्डाणांसाठी एटीएफ मध्ये एक टक्का इथेनॉल आणि वर्ष २०२८ पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी २ टक्के इथेनॉल जोडण्याचे मान्य केले आहे. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळले जात आहे. भविष्यात ते २०३० पर्यंत २० टक्क्यांवर आणण्याची योजना आहे.