किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१० जुन) – नवीन केंद्रीय मंत्री परिषदेत एकूण ७ महिलांचा समावेश करण्यात आला असून, त्यापैकी २ महिलांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्याच वेळी, ५ जून रोजी विसर्जित झालेल्या मागील मंत्रिमंडळात एकूण १० महिला मंत्री होत्या. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, साध्वी निरंजन ज्योती, दर्शना जरदोश, मीनाक्षी लेखी आणि प्रतिमा भौमिक यांना १८ व्या लोकसभेच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. माजी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, भाजपा खासदार अन्नपूर्णा देवी, शोभा करंदलाजे, रक्षा खडसे, सावित्री ठाकूर आणि निमुबेन बांभनिया आणि अपना दल खासदार अनुप्रिया पटेल यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.
सीतारामन आणि अन्नपूर्णा यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे, तर बाकीच्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत इराणी, पवार आणि ज्योती यांना अनुक्रमे अमेठी, दांडोरी आणि फतेहपूर या विद्यमान जागा गमवाव्या लागल्या. त्याचवेळी जरदोश, लेखी आणि भौमिक यांना भाजपाने तिकीट दिले नाही. सार्वत्रिक निवडणुकीत ७४ महिला उमेदवार विजयी झाले आणि ही संख्या २०१९ मध्ये निवडून आलेल्या ७८ महिला उमेदवारांपेक्षा थोडी कमी आहे. रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील ७१ सदस्यांनी शपथ घेतली अशी माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाचे वर्णन तरुण आणि अनुभवी लोकांचे उत्तम मिश्रण असे केले. जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असेही ते म्हणाले. मी १४० कोटी भारतीयांची सेवा करण्यासाठी आणि भारताला प्रगतीच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी मंत्रिमंडळासोबत काम करण्यास उत्सुक आहे, असे मोदींनी शपथविधीनंतर लगेचच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले. नवनियुक्त मंत्र्यांचे अभिनंदन करताना ते म्हणाले, ’मंत्र्यांचा हा संघ तरुण आणि अनुभवी लोकांचा उत्तम मिलाफ आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या परदेशी मान्यवरांचेही मोदींनी आभार मानले.