किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-एक जग, एक भविष्यावर मोदींचा भर,
-जी-२० शिखर परिषदेचा समारोप,
भारत मंडपम्, (१० सप्टेंबर) – जेव्हा आम्ही प्रत्येक देशाची सुरक्षा आणि संवेदना यांचा विचार करू, तेव्हाच सर्व देशांचे भविष्य सुरक्षित होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या जी-२० च्या द्विदिवसीय शिखर परिषदेचा आज समारोप झाला. तत्पूर्वी परिषदेतील तिसर्या सत्रातील समारोपीय भाषणात मोदी बोलत होते. जी-२० च्या दिल्ली घोषणापत्रावर परिषदेच्या पहिल्या दिवशीच सर्वसहमती झाली होती. आपल्या समारोपीय भाषणात मोदी यांनी जगाच्या एका भविष्यावर जोर दिला. आम्ही अशा भविष्याची गोष्ट करीत आहे, जी आम्हाला ग्लोबल व्हिलेजमधून ग्लोबल फॅमिलीमध्ये परिवर्तित करेल. आम्ही असे भविष्य पाहतो आहे, ज्यात फक्त सर्व देशांचे हितच नाही तर, हृदयही जुडलेले असेल, असे मोदी म्हणाले.
जी-२० च्या अध्यक्षपदाच्या काळात मी नेहमीच सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) केंद्रित भूमिकेच्या ऐवजी मानवीय भावनांनी परिपूर्ण अशा भूमिकेचा आग‘ह धरला होता. भारतासारख्या देशाजवळ जे काही होते, ते आम्ही अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जगाला देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या मिशन चांद्रयानमधून जी माहिती आम्हाला मिळणार आहे, ती व्यापक मानवीय हितासाठी संपूर्ण जगाला देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून आमच्या मानवतावादी भूमिकेंचा जगाला परिचय होतो, असे मोदी यांनी सांगितले.
आज काही ज्वलंत समस्या जगासमोर उभ्या ठाकल्या आहे. या समस्यांमुळे आमचा वर्तमान काळच नाही तर, भविष्यकाळही प्रभावित होणार आहे. सायबर सुरक्षा आणि कि‘प्टो करन्सीमुळे उद्भवणार्या संकटाची आम्हाला जाणीव झाली आहे. क्रिप्टो चलनाला नियंत्रित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही ठोस निर्णय आम्हाला घ्यावे लागणार आहेत. यासाठी आमच्यासमोर बेसल स्टॅण्डर्ड ऑफ बँक रेग्युलेशनचा आधार आहे. त्याआधारे काही महत्त्वाचे निर्णय आम्हाला घ्यावे लागणार आहेत. सायबर सुरक्षेच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी वैश्विक पातळीवरील सहकार्याची तसेच कायदेशीर चौकटीची गरज पडणार आहे, याकडे मोदी यांनी जगाचे लक्ष वेधले.
सायबर युगामुळे दहशतवादाचे नवेनवे आयाम खुले होत असून, निधीपुरवठाही या कामासाठी सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे या संकटाचे निराकरण करण्यासाठी आम्हाला तातडीची उपाययोजना करावी लागणार आहे. प्रत्येक देशाची सुरक्षा आणि समृद्धीच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्रात काळानुरूप बदल व्हावे
संयुक्त राष्ट्रांत काही सुधारणा होण्याची आवश्यकता प्रतिपादित करताना मोदी म्हणाले की, जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी याची नितांत गरज आहे. आंतरराष्ट्रीय संस्था विद्यमान परिस्थितीला अनुरूप असल्या पाहिजे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद याचे ताजे उदाहरण आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली, तेव्हाचे जग आणि आजचे जग यात खूप फरक पडला आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना झाली, तेव्हा ५१ देश त्याचे संस्थापक सदस्य होते. आज संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांची सं‘या दोनशेवर गेली आहे. मात्र, आजही संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील सदस्यांची संख्या तेवढीच आहे, त्यात कोणतीच वाढ करण्यात आली नाही. सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य देशांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी मोदी यांनी यावेळी केली.
जी-२० चे अध्यक्षपद ब्राझीलकडे
या परिषदेत जी-२० चे अध्यक्षपद पुढील वर्षभरासाठी ब्राझीलकडे सोपवण्यात आले. ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्व्हा यांनी मोदी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. जी २० च्या अध्यक्षपदाचे प्रतिक असलेले बॅटन मोदी यांनी दा सिल्व्हा यांच्याकडे सोपवले. येत्या नोव्हेंबर महिन्यात जी २० च्या सदस्य देशांची आभासी पद्धतीने बैठक बोलावण्याची घोषणा करताना मोदी यांनी या परिषदेत सर्व नेत्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. भारताने ब्राझीलकडे जी-२० चे अध्यक्षपद सोपवले असले तरी, भारताकडे नोव्हेंबर महिन्यापर्यंत जी-२० चे अध्यक्षपद कायम राहणार आहे.