किमान तापमान : 29.99° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.14°से. - 30.61°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – अनुभवी गुंतवणूकदार आणि रिटेल चेन डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी यांनी मिलेनिया २०२३ च्या टॉप २०० सेल्फ-मेड उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल २.३८ लाख कोटी इतके आहे. त्यानंतर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांचा क्रमांक लागतो. बिन्नी आणि सचिन बन्सल यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. ज्यांच्या कंपनीचे इक्विटी मूल्य १.१९ लाख कोटी आहे, असे आयडीएफसी फर्स्ट प्रायव्हेट हुरुन इंडियाच्या ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
झोमॅटोचे दीपिंदर गोयल ८६,८३५ कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह तिसर्या स्थानी आहेत. चौथ्या स्थानी स्विगीचे श्रीहर्ष मॅजेटी आणि नंदन रेड्डी आहेत. विशेष म्हणजे, यातील टॉप-१० सर्वांत मौल्यवान कंपन्यांपैकी आठ स्टार्टअप्स आहेत. २००० नंतर स्थापन झालेल्या भारतातील सर्वांत मौल्यवान २०० कंपन्यांमध्ये ४०५ संस्थापक आहेत. या यादीतील सर्व कंपन्यांचे एकत्रित मूल्य ३० लाख कोटी असून, ते डेन्मार्कच्या जीडीपी इतके आहे.
कैवल्य व्होरा सर्वांत तरुण उद्योजक
झेप्टोचे २१ कैवल्य व्होरा हे सेल्फ-मेड उद्योजकांमध्ये सर्वांत तरुण आहेत. त्यानंतर भारत-पेचे शाश्वत नकरानी आणि जुपीचे २७ वर्षीय दिलशेर माल्ही हे सर्वांत तरुण उद्योजक म्हणून ओळखले जातात. नायकाच्या फाल्गुनी नायर या महिला उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. तर ममाअर्थच्या गझल अलघ आणि विंझोच्या सौम्या सिंह राठोड या सर्वांत तरुण महिला उद्योजक आहेत. या दोघी ३५ वर्षे वयाच्या आहेत. यशस्वी उद्योजक देशातील २३ शहरांमधील आहेत. यात बंगळुरू (१२९), मुंबई (७८), गुरुग‘ाम आणि नवी दिल्लीतील (४९) उद्योजकांचा समावेश आहे.