किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२४ सप्टेंबर) – सूर्याचा प्रकाश मिळाल्यानंतर स्वतःच जागे होता येईल, असे तंत्रज्ञान चांद्रयान-३ च्या विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हरमध्ये वापरण्यात आले आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ते स्वयंचलितपणे सक्रिय होतील. आपल्याला केवळ दोन्हींवर नजर ठेवायची आहे. आपल्याकडे अजूनही १३-१४ दिवस आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. चांद्रयान-३ च्या विक्रम लॅण्डर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडवर टाकण्यात आले, त्यावेळी त्यातील काही सर्किट्सला जागृतावस्थेत राहण्याची कमांड देण्यात आली होती. २२ सप्टेंबरला पाठवला जाणारा संदेश प्राप्त करण्यासाठी ते जागृतावस्थेत ठेवण्यात आले. इस्रो त्यांच्यासोबत संपर्क स्थापन करीत आहे. मात्र, विक्रम आणि प्रज्ञानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दिवस असेपर्यंत कधीही विक्रम आणि प्रज्ञान जागे झाल्याचे वृत्त येऊ शकते. म्हणजेच शिवशक्ती पॉईंटवर पुन्हा अंधार होईपर्यंत चांगली माहिती येऊ शकते. लॅण्डर आणि रोव्हरला २३ सप्टेंबर रोजी जागृतावस्थेत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे इस्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी यापूर्वी सांगितले होते. सध्या लॅण्डर-रोव्हर निष्क्रिय आहे. त्यांच्याकडून प्रतिकि‘या येईपर्यंत हा प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रावर दिवस उजाडला आहे. तिथे प्रकाश पूर्णतः उपलब्ध आहे. मात्र, लॅण्डर व रोव्हरला अद्याप पुरेशी ऊर्जा मिळालेली नाही. चांद्रयान-३ कडून विविध माहिती मिळाली आहे. इस्रो त्याचे विश्लेषण करीत आहे. मागिल दहा दिवसांच्या डेटाचे विश्लेषण केले जात आहे. या कालावधीत प्रज्ञानने १०५ मीटरपर्यंत चंद्रावर भ‘मण केले होते. सध्या चंद्राचे तापमान उणे १२० ते २२० अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे त्याच्या सर्किटमध्ये बिघाड होऊ शकतो.
युरोपियन अंतराळ संस्थेने पाठवले होते सिग्नल
२२ सप्टेंबर रोजी सकाळी युरोपियन अंतराळ संस्थेच्या कोरोऊ अंतराळ केंद्रावरून लॅण्डरला सातत्याने संदेश पाठवण्यात आले. मात्र, लॅण्डरचा प्रतिसाद अत्यंत कमजोर होता. लॅण्डरकडून ज्या शक्तिशाली रेडिओ फ्रिक्वेन्सीने सिग्नल यायला पाहिजे होते, तसे आले नाहीत.