किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.72° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.23° से.
22.99°से. - 24.74°से.
रविवार, 12 जानेवारी घनघोर बादल22.18°से. - 25.29°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.33°से. - 26.94°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.75°से. - 25.03°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.26°से.
गुरुवार, 16 जानेवारी साफ आकाश24.45°से. - 26.41°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०७ जानेवारी) – वायुदलाने रात्रीच्या वेळी किर्र अंधारात सी-१३० जे सुपर हर्क्युलस विमान यशस्वीरीत्या कारगिलच्या धावपट्टीवर उतरवले. वायुदलाचे हे मोठे यश मानले जात आहे. या विमानात वायुदलाचे गरुड कमांडो होते. आपत्कालीन परिस्थितीत लवकरात लवकर जवानांना तैनात करण्यासाठी या प्रशिक्षणाचा भाग म्हणून रात्रीच्या वेळी हर्क्युलस विमान कारगिलमध्ये उतरवण्यात आले.
अडचणीच्या परिस्थितीत उंच ठिकाणांवर विमान उतरवणे नेहमी आव्हानात्मक राहते. अशा परिस्थितीत कारगिल येथील उंच पर्वतीय भागात हर्क्युलस विमानाचे लॅण्डिंग हे एक मोठे यश मानले जात आहे. या माध्यमातून कारगिलच्या हवाईपट्टीवर यशस्वीपणे विमान उतरवून वायुदलानने आपले तांत्रिक कौशल्यच दाखवले नाही, तर या मोहिमेचे धोरणात्मक महत्त्वही मोठे आहे. याआधी वायुलदाच्या वैमानिकांनी उत्तराखंडातील धारासू येथे सुपर हर्क्युलस विमानाचे यशस्वी लॅण्डिंग केले होते. महत्त्वाचे म्हणजे, आव्हानात्मक ऋतुमध्ये हे लॅण्डिंग करण्यात आले होते. लॅण्डिंग करण्यात आलेले ठिकाण तीन हजार फूट उंचीवर आहे. सुपर हर्क्युलस विमान अमेरिकेच्या लॉकहिड मार्टिनने तयार केले आहे. हे मालवाहतुकीसाठी वापरले जाते. भारतीय वायुदलाच्या बाराव्या फ्लीटचा हे विमान हिस्सा आहे. २०११ मध्ये या विमानाचा समावेश वायुदलात करण्यात आला.
कारगिलची हवाईपट्टी ८,८०० फूट उंचीवर
कारगिलची हवाईपट्टी ८,८०० फूट उंचीवर आहे. इतक्या उंचीवर खराब वातावरणात आणि वारा वेगात वाहत असल्यास विमान उतरवणे अतिशय जिकिरीचे काम आहे. त्यासाठी उच्च पातळीच्या तांत्रिक कौशल्याची गरज असते. गरुड कमांडोंना यशस्वीरीत्या कारगिलला पोहोचवल्याने वायुदलाच्या वाहतूक तसेच जमिनीवरील तयारी स्पष्ट झाली आहे. अडचणीच्या काळात वायुदल तातडीने जवानांना तैनात करू शकते, हे या माध्यमातून सिद्ध झाले आहे.