किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलगेल्या सहा महिन्यांपासून विवरण भरले नाही,
नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर – गेल्या सहा किंवा त्याहून अधिक महिन्यांपासून परतावा न भरणार्या सुमारे ५.४३ लाख करदात्यांची जीएसटी नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय महसूल विभाग अधिकार्यांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर घेण्यात आला. आतापर्यंत सुमारे ८० लाख विक्री परतावा किंवा जीएसटीआर -३ बी दाखल केले गेले आहेत.
जीएसटी अधिकार्यांनी गेल्या महिन्यात जीएसटी विवरण दाखल करणार्या शीर्षस्थ २५ हजार करदात्यांची ओळख पटविली आहे. परंतु २० नोव्हेंबरपर्यंत त्यांनी परतावा भरला नव्हता. त्यामुळे जीएसटी अधिकारी भ्रमणध्वनी लघुसंदेश व ई-मेल संप्रेषणे पाठवून त्यांच्याकडे वैयक्तिक रीत्या पाठपुरावा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ऑक्टोबर महिन्याचा जीएसटी परतावा भरण्याची मुदत २० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, सुमारे २५ हजार करदात्यांनी अद्यापही जीएसटी जमा केलेला नाही, असे महसूल अधिकार्यांनी सांगितले. आम्ही या सर्वांना जीएसटीआर -३ बी भरण्याचे पुन्हा आवाहन करू, असेही अधिकारी म्हणाले.
चालू आर्थिक वर्षात कोरोना टाळेबंदी व परिणामी अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे महसुलाला मोठा फटका बसला होता. मात्र, आता अर्थव्यवस्थेला गती येत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे महसुलातही वाढ होत आहे. एप्रिलमधील महसूल ३२,१७२ कोटी रुपये, मे ६२,१५१ कोटी रुपये, जून ९०,९१७ कोटी रुपये, जुलै ८७,४२२ कोटी रुपये, ऑगस्ट ८६,४४९ कोटी रुपये, सप्टेंबर ९५,४८० कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये १,०५,१५५ कोटी रुपये होता.
दरम्यान, जीएसटी बनावट चलन घोटाळ्यांंविरोधात नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी मोहिमेमध्ये जीएसटी गुप्तचर महासंचालनालय (डीजीजीआय) आणि आणि केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने आतापर्यंत ८५ जणांना आयटीसीचा गैरवापर करून फायदा करून घेतल्याबद्दल अटक केली आहे. देशभरात ३११९ हून अधिक बनावट जीएसटीआयएन संस्थांविरूद्ध ९८१ गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.