किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल=जीएसएलव्हीचाच वापर करणार=
नवी दिल्ली, (१० जानेवारी) – ‘चांद्रयान-१’ या मोहिमेला प्रचंड यश प्राप्त झाल्याने तसेच मंगळयानाच्याही यशस्वी प्रक्षेपणाने आत्मविश्वास द्विगुणीत झालेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ‘चांद्रयान द्वितीय’ २०१७ मध्ये हाती घेण्याची घोषणा आज केली.
भारताची पहिली मोहीम चंद्राच्या कक्षेची तपासणी करणारी होती. आता या दुसर्या मोहिमेच्या काळात चंद्राच्या पृष्ठभागावर काही नवीन प्रयोग करण्यात येणार आहेत. स्वदेशातच विकसित करण्यात आलेला रोव्हर या मोहिमेत पाठविण्यात येईल आणि जीएसएलव्ही यानाचा वापर करण्यात येईल, अशी माहिती इस्रोचे सचिव के. राधाकृष्णन यांनी पत्रपरिषदेत दिली.
चांद्रयान-१ ही मोहीम २२ ऑक्टोबर २००८ रोजी चेन्नईच्या श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आली होती. या यानाने चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर भ्रमण केले. रासायनिक, खनिजविषयक आणि भौगोलिक महत्त्वाची छायाचित्रे या पहिल्या मोहिमेच्या काळात भारताला प्राप्त झाली होती.
चांद्रयान-२ या मोहिमेची माहिती देताना राधाकृष्णन म्हणाले की, या मोहिमेकरिता आम्ही स्वदेशी रोव्हर विकसित केला आहे. अन्य अभ्यासही पूर्ण झालेला आहे. २०१६ च्या अखेरीस किंवा २०१७ च्या सुरुवातीला आम्ही ही मोहीम हाती घेणार आहोत. तथापि, चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याकरिता काही तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा लागणार आहे. या कालावधीत तो पूर्ण करण्यात