किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनेदरलॅण्ड्स, (२ जानेवारी) – माणसाला मंगळ या लाल ग्रहाचे प्रचंड आकर्षण आहे. अमेरिकेतील एका खाजगी संस्थेच्या वतीने मंगळावर कायम मनुष्य वस्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने जगभरातून मागविण्यात आलेल्या निवेदनांपैकी ६२ भारतीयांची निवड झाली आहे. २०२४ मध्ये मंगळावर स्थायिक होणार्यांचा पहिला जत्था रवाना होणार आहे.
नेदरलॅण्डस्च्या या संस्थेला एकूण दोन लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यात वीस हजार भारतीयांनीही मंगळाच्या मातीवर मनुष्य वसाहत स्थापन करण्यात आपण ईच्छूक असल्याचे स्पष्ट केले होते. एकूण अर्जदारांपैकी १,०५८ जणांची मंगळावर जाण्यासाठी निवड करण्यात आली असून, त्यात ६२ भारतीयांचा समावेश आहे. संबंधित संकेतस्थळावरून दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक अर्जदार अमेरिकेतून निवडण्यात आले आहेत. त्यांची संख्या २९७ इतकी आहे. त्यानंतर, ७५ उमेदवारांसह कॅनडाचा आणि नंतर भारताचा क्रमांक आहे. ५२ अर्जदारांच्या निवडीसह रशिया चौथ्या स्थानावर आहे.
‘मार्स वन’ या संस्थेचे सहसंस्थापक बॅस लान्सड्रॉप यांनी उपक्रमाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘मंगळावर स्थायिक होण्यासाठी ते मानसिकरित्या तयार असून उपक्रमाच्या यशस्वितेबाबत ते गंभीर आहेत,’ असेही ते म्हणाले. यावेळी निवड न होऊ शकलेल्या व्यक्तींनी नंतर पुन्हा अर्ज करावा, असे सांगून लान्सड्रॉप म्हणाले की, पुढच्या नोंदणीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. २०१८ मध्ये मंगळावर मानवरहीत यान धाडले जाणार आहे २०२४ पासून कायम ‘मंगळवासी’ होणार्यांची रवानगी दर दोन वर्षांच्या अंतराने प्रत्येक वेळी चार सदस्य याप्रकारे सुरू होणार आहे.