किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल•चौफेर : अमर पुराणिक•
गेल्या वीस वर्षात देशात इतके दहशतवादी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले, अब्जावधींची भ्रष्टाचारांची प्रकरण उघडकीस आली तेव्हा या अमीर खान, शाहरुख खानाला असुरक्षित वाटले नाही. पण आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात अशा घटना घडल्या नाहीत तरी या खानाला अचानकच असुरक्षित वाटू लागते याला काय म्हणावे. प्रेक्षक, जनता दूधखूळी वाटली की काय याला? बिहार निवडणूकीआधीपासून काही सेक्यूलर विचारवंत, लेखकांकडून आणि विशेषत: माध्यमांकडून पद्धतशीरपणे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात आता चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अमीर खानची भर पडली आहे.
अभिनेता अमीर खाननं त्याची बायको किरण रावला भारतात असुरक्षित वाटतयं असं विधान करुन देशात वातावरण भडकवले आहे. देशात असहिष्णूता वाढतेय असं भोंगळ कारण पुढे करत पुरस्कार परत करणार्यांचा पुरस्कार वापसीचा अध्याय संपला न संपला तोच या अमीर खानानं याचा दुसरा अध्याय सुरु केला. देशात असहिष्णूता वाढतेय असे काल्पनिक वातावरण निर्माण करत देशात प्रचंड असुरक्षितता असल्याचा भास निर्माण करण्यासाठी हा टुकार अभिनेता अशी विधानं करुन भारतासारख्या सहिष्णू देशात सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करतोय, भारतीय जनतेला ब्लॅकमेल करतोय. त्यात तथाकथित सेक्यूलर माध्यमं, विचारवंत आणि कॉंग्रेस, डावे व्यक्ती स्वतंत्र्याच्या नावाखाली तेल ओतण्याचं काम करताहेत. या कृत्यालाही अनेक पैलू आहेत. अशी विधानं करण्यापाठीमागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मोदी सरकार अस्थिर करणे, देशातील शांततेला आणि विकासाला खीळ लावणे आहे.
गेल्या वीस वर्षात देशात इतके दहशतवादी हल्ले झाले, बॉम्ब स्फोट झाले, अब्जावधींची भ्रष्टाचारांची प्रकरण उघडकीस आली तेव्हा या अमीर खान, शाहरुख खानाला असुरक्षित वाटले नाही. पण आता मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात अशा घटना घडल्या नाहीत तरी या खानाला अचानकच असुरक्षित वाटू लागते याला काय म्हणावे. प्रेक्षक, जनता दूधखूळी वाटली की काय याला? बिहार निवडणूकीआधीपासून काही सेक्यूलर विचारवंत, लेखकांकडून आणि विशेषत: माध्यमांकडून पद्धतशीरपणे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यात आता चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि अमीर खानची भर पडली आहे. काही दिवसांपुर्वी शाहरुख खाननेही अशीच वाह्यात विधानं केली होती. या अमीर खान आणि शाहरुख खानाला या देशातील जनतेने मोठे केले. आफाट पैसा आणि प्रसिद्धी दिली. चाहत्यांनी यांना आपल्या गळ्यातला ताईत बनवलं. हे टुकार अभिनेते याचा अर्थ असा घेत आहेत की यांनी काहीही केलं तरी यांचे चाहते यांना डोक्यावर घेतील. पण अमीर खान, शाहरुख खान विसरत आहेत की, जर देशद्रोही विधानं आणि कृत्यं केली तर जनता यांना पायदळी तुडवून काढल्याशिवाय राहणार नाही. या देशात राहून इथल्या जनतेच्या पैशावर मोठे झालेल्या या बांडगुळांना याच देशातील जनता उखडून फेकायला कमी करणार नाही हे विसरु नये.
आज ज्येष्ठ पत्रकार, ‘सडेतोड’कार कै. अरुण रामतीर्थकर सर आपल्यात नाहीत. अमीर खानचं हे प्रकरण चालू झाल्यापासून रामतीर्थकर सरांची प्रकर्षाने आठवण होतेय. रामतीर्थकर सर जर आज असते तर ‘देश सोडून चालता हो!’ अशा मथळ्याचा ‘सडेतोड’ त्यांनी तरुण भारतमध्ये लिहिला असता. अक्षरश: रामतीर्थकर सरांनी या खानाची पीसं काढली असती. या देशाने यांना इतके मोठे केले. मान, पैसा, प्रेम, प्रसिद्धी दिली. शेवटी हे या देशावरच उलटले. आणि म्हणतोय भारतात असुरक्षित वाटतयं. जर भारतात तशी परिस्थिती असती तर अमीर खान, शाहरुख खान ही नावं देखील कोणाला माहित झाली नसती. आज हे बोलण्याचं धाडस हा करतोय किंवा हे बोलण्याचं स्वातंत्र मिळालय ते मिळालं असतं का?
देशात असहिष्णूता असल्याचा कांगावा करत देशाची बदनामी करण्याचे षडयंत्र पद्धतशीरपणे राबले जातेय. या षडयंत्राच्या माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे आणि देशाच्या प्रगतीच्या वाटेत काटे पसरवण्याचे काम याच देशातील या सेक्यूलर मंडळींकडून करवून घेतले जातेय. गेल्या दिड वर्षात पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले राष्ट्रहीताचे निर्णय या बांडगुळांना त्रासाचे वाटताहेत. मुंबईच्या सिनेसृष्टीतील या सेक्यूलरांच्या पाचावर धारण बसण्याचे आणखी एक कारण आहे. देशातील अतिरेकी कारवाया उखडून फेकण्याच्यादृष्टीने सरकार पावले टाकतेय. दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी मोदी सरकारकडून फास आवळला जातोय. त्याचा हा परिणाम आहे. या सेक्यूलरवाद्यांना आणि विशेषत: मुंबई चित्रपटसृष्टीतील काही लोकांनी याचा धसका घेतला आहे. मुंबईच्या चित्रपटसृष्टीवर दाऊद इब्राहिमची पकड आहे. येथील काही लोकांचे साम्राज्य दाऊद इब्राहिमच्या पाठींब्यावर उभे आहे. दाऊदची हिंदी चित्रपटसृष्टीवरील पकड सुटू नये, जर दाऊद पकडला गेला तर यांची दुकाने बंद पडतील म्हणून हा अकांडतांडव केला जातोय. जसजसे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अधिक आक्रमक होतील आणि दाऊदच्या मुसक्या आवळत जातील तसतसे या सिनेसृष्टीतील काही सेक्यूलरांचा थयथयाट वाढत जाणार आहे.
या देशातील जनतेने यांना इतके प्रेम दिले, पैसा दिला, पण हे अमीर खान, शाहरुख खान कधीही कोणत्या सामाजिक कामात योगदान देताना दिसलेले नाहीत. या देशातील जनतेच्या जीवावर मिळालेल्या पैशावर हे लोक इतकी माजोरी भाषा बोलताहेत. महाराष्ट्रात शेतकर्यांनी इतक्या आत्महत्या केल्या तेव्हा यांना सहिष्णूतेची जाणिव झाली नाही. अभिनेता अक्षय कुमारने आत्तापर्यंत जवळजवळ एक कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक मदत आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना दिली आहे. तेही कोणताही गवगवा न करता. अजुनही मदत करतोच आहे. पण प्रसारमाध्यमांना या बातमीला प्रसिद्धी द्यावीशी वाटली नाही. पण हा अमीर खान ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमातून कोट्यवधी रुपये घेऊन लोकांना शहाणपणाचे उपदेश देतोय. पण कोणत्याही सामाजिक समस्येत, राष्ट्रीय समस्येत या अमीर खानने कवडीची मदत केली नाही. उलट कोट्यवधी रुपये खिशात घालून फुशारकी मारतोय. जेव्हा देशात दहशतवादी हल्ले झाले, शेकडो लोक मारले गेले, नैसर्गिक दुर्घटना घडल्या तेव्हा यांची सहिष्णूता कोठे वाळुत तोंड खुपसून बसली होती. देशाच्या सीमेवर भारतीय जवानांचे मुडदे पडत होते तेव्हा यांना असहिष्णूता वाटली नाही का?
अशा संधीसाधू आणि देशप्रेमाचा लवलेश नसलेल्या अभिनेत्यांना त्यांची जागा जनता दाखवेलच दाखवेल. सोशल मिडीयात अमीर खानच्या विकृत विधानावरुन तुफान वादळ उठलेय. अमीर खान आणि शाहरुख खानवर प्रचंड टीकेची झोड उठली आहे. यांचे चित्रपट पाहू नये, त्यांनी केलेल्या जाहिरातींची उत्पादने घेऊ नये अशी आवाहनं करणारी, विनंती करणारे पोस्ट फिरताहेत, केवळ फिरतच नाहीत तर अशा पोस्टचा अक्षरश: पूर आलाय. अमीर खान ब्रँड अम्बॅसीडर असलेल्या स्नॅपडील या कंपनीला याचा खूप मोठा फटका बसला आहे. स्नॅपडीलचं ऍप धडाधड अनइनस्टॉल केले जात आहे. या शिवाय अमीर खानने जाहिराती केलेल्या इतर कंपन्यांनाही याचा फटका बसला आहे.
गेल्या पंधरा-वीस वर्षात जेव्हा एखादा मोठ्या बजेटचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हा चित्रपटाचे प्रमोशन केले जाते. त्याचबरोबर अशी वादग्रस्त विधानं करुन चित्रपटाची हवा निर्माण करण्याची कुप्रथा पडली आहे. टूकार चित्रपट काढून असला गदारोळ माजवून गल्ला जमवला जातो. हा ट्रेंड घातक आहे. अमीर खान, शाहरुख खान यांचे चित्रपट गुणवत्तेच्या जोरावर आणि स्वत:च्या बळावर, अभिनयाच्या बळावर कधीच चाललेले नाहीत. परफेक्शनिस्ट हे अमीर खानचे नामाभिधान माध्यमातील काही टूकार दलालांनी दिलेले आणि स्वयंघोषित आहे. हा लेकाचा इंग्रजी किंवा विदेशी चित्रपटांच्या कथा चोरून ऑस्कर पुरस्कार मागायला निघालाय. अन्यथा अशा टुकार अभिनेत्यांना आपले चित्रपट चालावे म्हणून स्टंटबाजी करण्याची गरज पडली नसती. लवकरच अमीर खानचा ‘दंगल’ आणि शाहरुख खानचा ‘दिलवाले’ प्रदर्शित होतोय. हे चित्रपट चालावे हाही या वादातून परभारे लाभ उठवण्याचा प्रयत्न आहे. भले देशात अराजकता निर्माण झाली तरी चालेल पण यांचा गल्ला जमला पाहिजे. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधी असली वाह्यात विधाने करुन चित्रपटाकडे लोकांना आकर्षित करण्याचा धंदा झाला आहे.
आजची परिस्थिती पाहता आता असले उद्योग बंद होतील अशी आशा आहे. जनतेला आता पडद्यामागील स्थिती कळत आहे. यांना जनताच धडा शिकवेल. आता वाद्रग्रस्त विधानं करुन, वादळ उठवून नंतर माफी मागेल. जनताही विसरुन जाईल. आजपर्यंत असेच झाले आहे पण यावेळी मात्र या अमीर खान आणि शाहरुख खान यांनी कितीही याचना केली, माफी मागितली तरीही प्रेक्षक त्यांना माफ करणार नाहीत. अशी देशविधातक विधाने करणार्या लोकांचे चित्रपट जनता पाहणार नाही. अशांचे चित्रपट जनतेच्या पैशावर चालतात. अशा विकृतांचे सिनेमे न पाहता लोक जोरदार झटका देणार अशी स्थिती आहे. आता कितीही माफी मागीतली तरी जनता क्षमा करणार नाही.