किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल•चौफेर : अमर पुराणिक•
मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले.
नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्याचा आनंद जदयु-राजद आणि महागठबंधनातील इतर पक्षांना नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला आणि त्यांना आनंद होणे स्वाभाविक ही आहे. पण, बिहारमधील विजेत्या पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना झाला नसेल इतका आनंद पाकिस्तानला झाला. पाकिस्तानला आनंद होण्याचे कारण लालूप्रसाद यादव-नीतिश कुमार हे विजयी झाले यापेक्षा भाजपा पराभूत झाल्याचा हा असूरी आनंद होता. पाकिस्तानमध्ये या विजयाचा आनंदोत्सव बिहारपेक्षा मोठ्याप्रमाणावर साजरा केला गेला.
पाकिस्तानला भाजपा पराभूत झाला, मोदींना पराभव पहावा लागला याचा इतका हर्षवायू झाला की, पाकिस्तानला त्यांच्या परराष्ट्र धोरणाचेही भान राहिले नाही. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर यामुळे पाकिस्तानची भारताबद्दल आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारबद्दलची नेमकी भूमिका आणि मानसिकता आपोआपच मांडली गेली. पाकिस्तानला मोदी यांच्या नेतृत्वातील उभरता भारत पाहायचा नाहीये. त्यांना भारतात कॉंग्रेसच्या नेतृत्वातील पाकधार्जिणे सरकार हवे आहे. दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानच्या तोंडाला मोदींच्या खंबीर नेतृत्वाला तोंड देताना अक्षरश: फेस येत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून पाकिस्तानला अशा बिकट परिस्थितीचा सामना करण्याची बहूदा पहिल्यांदाच वेळ आली आहे. भारतात मोदींचे भाजपा सरकार नकोय असे पाकिस्तानला जसे वाटतेय तसेच भारतातील सेक्यूलरवाद्यांनाही वाटतेय. विरोधी पक्षांना तर हे वाटणे स्वाभाविकच आहे. पण विशेषत: कॉंग्रेस, डावे आणि नीतिश कुमार, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव यांना सत्तेची प्रचंड लालसा लागली आहे. त्यासाठी ते पाकिस्तानचीही मदत घेताहेत. हे सत्तालोलूप विरोधक आणि सेक्यूलरवाद्यांना सत्ता उपभोगायची आहे, त्यांना सत्तासुंदरीचा विरह ५ वर्षेही सहन होईना. मग त्यासाठी देश गहाण ठेवण्याचीही त्यांची तयारी आहे. बिहारच्या जनतेला हे कळले नाही हे या देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल.
गेल्या अनेक दशकांपासून भाजपाला सत्ता मिळू नये म्हणून निकराचे प्रयत्न झाले आहेत. भाजपाचा, नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा म्हणून आंतरराष्ट्रीय स्थरावरुन मोठे प्रयत्न झालेत, होताहेत. भाजपाची सत्ता उलथून टाकण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न विदेशातून होताहेत. त्याला या देशातील कॉंग्रेसचे नेते, डावे आणि सेक्यूलर मंडळी साथ देताहेत. त्यासाठी या सेक्युलर मंडळींची पाकिस्तानचे मांडलिकत्व स्विकारण्याचीही तयारी आहे. पाकिस्तान, ख्रिश्चन मिशनर्या आणि बर्याच स्वयंसेवी संस्था अनेक दशकांपासून हाच प्रयत्न करताहेत. पाकिस्तानने भारतातील काही माध्यमांना हाताशी धरून दशकानुदशक हा अघोरी सारिपाट मांडला आहे. राजदीप सरदेसाई, बरखा दत्तसारखे माध्यमातील काही प्रेस्टीट्यूट वृत्तीचे लोक स्वार्थासाठी देशविघातक कृत्यं करत आहेत.
भारतातील प्रत्येक घटनेवर पाकिस्तानचे बारिक लक्ष असते. पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्था भारतातील असल्या सेक्यूलर बांडगुळांचा सर्रास वापर करत असते. बिहार निवडणुकांचे वेध लागल्यानंतर अचानक भारतात असहिष्णूता फोफावल्याचा साक्षात्कार या सेक्यूलर विचारवंतांना झाला. आणि त्यांनी एका पाठोपाठ एक पुरस्कार वापसी सुरु केली. सतत भाजपा आणि मोदी सरकारविरोधात वाट्टेल तशी विधाने करणे सुरु केले आणि माध्यमांनी ती विधाने मसाला लावून भडकपणे दाखवली. आता बिहारच्या निवडणुका संपल्यापासून हे सेक्यूलर विचारवंत कुठल्या बिळात लपून बसले आहेत. की बिहारच्या निवडणुका संपल्यानंतर एकदमच भारतातील असहिष्णूता संपली आहे? बिहारमध्ये भाजपाची सत्ता येऊ नये म्हणून या सेक्युलर विचारवंतांनी असहिष्णुतेची अवई उठवली होती. पाकिस्तानलाही बिहारमध्ये भाजपाचे सरकार येऊ नये असे वाटत होते हे त्यांनी भाजपाचा पराभव साजरा केला यावरून दिसून येतेच ना! सेक्यूलर विचारवंतांना मोदी सरकारचा राग येण्याचे दुसरे एक कारण असावे. ते म्हणजे मोदींनी विदेशी एनजीओकडून येणार्या पैशावर चाप लावला आहे. त्यामुळे यांचे चोचले थांबले आहेत हाही राग असावा.
मूळात केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार आल्यापासून पाकिस्तानच्या पाचावर धारण बसली आहे. मोदींनी पाकिस्तानच्या मुसक्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्थरावर आवळायला सुरुवात केली आहे. पण लोकसभेत भाजपाकडे बहूमत असले तरी राज्यसभेत भाजपाचे बहूमत नाही. आणि जर भाजपाने बिहारच्या निवडणुका जिंकल्या असत्या तर भाजपा राज्यसभेतही बहुमताजवळ पोहाचली असती आणि जर भाजपा राज्यसभेत बहुमताजवळ पोहोचली असती तर मग भाजपा अनेक राष्ट्रहीताचे निर्णय कोणत्याही अडथळ्याविना घेऊ शकली असती. मोदी सरकारने आता घेतलेला विकासाचा वेग चौपटीने वाढला असता. मग पाकिस्तानची पळता भूई थोडी झाली असती. याच भीतीतून पाकिस्तानने भारतातील या व्हाईट कॉलर्ड सेक्युलर दलालांकरवी खेळी सुरु केली आणि बिहारची जनता या खेळीत फसली आणि देशाचे प्रचंड मोठे नुकसान करुन गेली.
नीतिश कुमारांच्या विजयोत्सवात सामिल झालेली मंडळी पाहिली की अनेक बाबीचा उलगडा होतो. नीतिश कुमारांना शुभेच्छा द्यायला बरखा दत्त स्वत: बिहारला गेल्या होत्या इतकेच नाही तर नीतिश कुमारांना शुभेच्छा देतानाचा फोटोही ट्वीटरवर टाकला होता. पुरस्कार वापसीतील बरीच मंडळी या विजयाने आनंदून गेली आहेत. असहिष्णूतेचा दंभ खास बिहार निवडणुकीसाठीच राबला गेला की काय? ही शंका आता खरी ठरली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळीही असेच प्रकार घडले. ही सर्व सेक्यूलर मंडळी आम आदमी पार्टीच्या पाठीशी उभी राहिली. अरविंद केजरीवाल यांनीही त्यावेळी पाकिस्तानची हाजी-हाजी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये घडली. अशा सेक्यूलरांच्या पाठींब्यामुळे आणि भारतविरोधी राष्ट्राच्या मदतीने भारताच्या विकासात अडथळा आणून पाकधार्जिणे सरकार भारतात आणण्याचा प्रयत्न होतोय. आता बिहारमध्ये सत्ता मिळाल्यानंतर नीतिश कुमारांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत. तेही याच जोरावर लागलेले असावेत.
याचा आणखीन एक लख्ख पुरावा म्हणजे काही दिवसांपुर्वी कॉंग्रेस नेते मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी केलेली विधाने. मणीशंकर अय्यर आणि सलमान खुर्शिद यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरोधात गरळ ओकली आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीवर बोलताना मणीशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडे याचना केली, अक्षरश: भीक मागितली आहे की, पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवावे. भारतीय जनतेने बहुमताने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी भारताच्या विरोधी पक्षाचा नेता, कॉंग्रेसचा नेता पाकिस्तानकडे करतो यातच यांच्या राष्ट्रद्रोही वृत्तीचे पुरावे आले. याच कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ ही होते. त्यांनी मणीशंकर अय्यर यांच्या विधानावर नापसंती व्यक्त करत पुढच्या निवडणुकीपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही असा जोडा हाणला. याचा अर्थ असा होतो की, भारतात भारतीय नागरिकांनी लोकशाही मार्गाने निवडलेले सरकार हटवण्याची मागणी पाकिस्तानकडे करणे म्हणजे या देशातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. या कॉंग्रेस नेत्यांना आणि सेक्यूलरांना या सरकारला काम करण्यासाठी पाच वर्षाचा कालावधी देण्याचीही इच्छा नाही. इतकी सत्तापिपासा या कॉंग्रेस नेत्यांना लागली आहे.
मणीशंकर अय्यर, सलमान खुर्शिद यांची विधाने, बिहारमधल्या भाजपाच्या पराभवाचा पाकिस्तानातील विजयोत्सव आणि प्रसारमाध्यमातील बरखा दत्त, राजदीप सरदेसाई यांच्यासारख्या माध्यमातील लोकांची आणि सेक्युलर विचारवंताची भूमिका पाहिल्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी मागे काही महिन्यांपुर्वी केलेले एक विधान आठवते की, भारताच्या डीप असेटस पाकिस्तान, चीनमध्ये नाहीत. पण पाकिस्तानच्या डीप असेटस भारतात प्रचंड मोठ्याप्रमाणात आहेत. पाकिस्तानसह इतर शत्रु राष्ट्रांनी जहाल अतिरेक्यांपासून ते व्हाईट कॉलर्ड विचारवंतांपर्यंत डीप असेटस भारतात पेरलेले आहेत. पाकधार्जिणी काही मंडळी, पुरस्कार वापसीवाले सेक्यूलर विचारवंत, माध्यमातील काही लोक, कॉंग्रेस, डावे यांसारखे पक्ष पाकिस्तानी डीपअसेटसचे भाग असावेत? यासाठीच आता संपुर्ण भारतीय जनतेने हे समजून सावध वागण्याची वेळ आली आहे.