|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:45 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.12° से.

कमाल तापमान : 28.7° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 2.68 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.7° से.

हवामानाचा अंदाज

27.8°से. - 29.04°से.

गुरुवार, 05 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.27°से. - 28.62°से.

शुक्रवार, 06 डिसेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

26.15°से. - 27.83°से.

शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.97°से. - 25.89°से.

रविवार, 08 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

22.95°से. - 26.45°से.

सोमवार, 09 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.1°से. - 27.21°से.

मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादल
Home » मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन, संवाद » इस्लामवर आधारित अल् कायदाचे साम्राज्य!

इस्लामवर आधारित अल् कायदाचे साम्राज्य!

मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन

जगात या घडीला लहान-मोठ्या मिळून ११० मुस्लिम दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. यात अल् कायदासारख्या विश्‍वविख्यात आहेत, तर काही संघटना एवढ्या छोट्या आहेत की, त्या फक्त स्थानीय स्तरावर आपल्या कारवाया करीत असतात. आपला प्रभाव दाखवण्यासाठी सर्वच संघटना, इस्लामच्या नावावर आम्ही समर्पित आहोत, असे सांगत असतात. पण, वास्तव हे आहे की, यातील बहुतांश संघटना आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थासाठी सक्रिय आहेत. कोणताही मुस्लिम इस्लामच्या नावावर काहीही करू लागला, तर याचा अर्थ असा नव्हे की, तो आपल्या धर्माशी एकनिष्ठ आहे. यात काहीही शंका नाही की, अल् कायदासारख्या संघटनासुद्धा आहेत, ज्या इस्लामच्या नावावरच संपूर्ण जगातील मुस्लिम राष्ट्रांमध्ये आपला शिरकाव करतात आणि सशस्त्र संघर्ष पुकारून सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. अमेरिकेने घोषणा केली होती की, २०१४ पर्यंत ती आपल्या फौजा अफगाणिस्तानमधून टप्प्याटप्प्याने काढून घेईल. पण, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती बराक ओबामांनी असे जाहीर केले की, जोपर्यंत अफगाणमध्ये शांतता प्रस्थापित होऊन तेथे निर्वाचित सरकार सत्तेवर येत नाही, तोपर्यंत आम्ही पाऊल मागे घेणार नाही. अमेरिकेला अशी भीती वाटते की, आशिया आणि आफ्रिकेत अजूनही अल् कायदा सक्रिय आहे. त्यामुळेच अमेरिका आपल्या हितासोबत समझौता करणार नाही. सध्या इस्लामी विश्‍वात ज्या काही घडामोडी घडत आहेत, त्या पाहता एक बाब स्पष्ट आहे की, अल् कायदा एक शक्तिशाली संघटना बनून आशिया आणि आफ्रिकेच्या देशांत घुसखोरी करू इच्छित आहे. या देशांवर अमेरिकेचे वर्चस्व आहे. त्यामुळे तेथे अन्य कुणाचा हस्तक्षेप वाढावा हे अमेरिकेला पसंत नाही. हे सर्वविदितच आहे की, आशिया व आफ्रिकेतील अनेक मुस्लिम देशांवर अमेरिका राजनैतिक आणि आर्थिक दृष्टीने हावी आहे. जर अन्य कुणी येऊन तिला आव्हान देत असेल, तर ते अमेरिकेच्या अस्तित्वासाठी आव्हान ठरेल.
अल् कायदा- जी जगातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना आहे- अमेरिकेची कट्टर शत्रू आहे. यासाठीच अमेरिका येनकेनप्रकारेण आपल्या प्रभावाखालील क्षेत्रात अल् कायदाला घुसू न देण्यासाठी प्रयत्नात आहे. अल् कायदा मुस्लिम देशांना आपली जहागीर समजून इस्लामी साम्राज्याची स्थापना करण्याच्या प्रयत्नात आहे. तिचे अंतिम लक्ष्य आहे, इस्लामी विश्‍वाला अमेरिकेच्या तावडीतून सोडवून आपल्या सत्ता प्रस्थापित करणे. पण, अल् कायदाचे हे सर्व मनसुबे तेव्हा धुळीस मिळाले, जेव्हा संघटनेचा सर्वांत मोठा नेता ओसामा बिन लादेन याला अमेरिकेने एबोटाबाद येथे वेढा घालून यमसदनी पाठविले. या घटनेचा बदला घेण्याची शपथ अल् कायदाने घेतली आहे. अल् कायदाने इराकच्या फलोजा आणि रमावी नगरांवर आपला कब्जा केला आहे व त्यामुळे त्याची हिंमत वाढली आहे. असे दिसते की, इराकमध्ये येणार्‍या काही दिवसांतच अल् कायदा व अमेरिकेत संघर्ष होईल. इराकमध्ये नूरी अल् मालिकीचे शिया सरकार असल्यामुळे तेथील बहुसंख्यक सुन्नी त्यावर चिडले आहेत. भविष्यात येथे संघर्षाचा मोठा स्फोट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. काही दिवस आधी जेव्हा इस्लामी देशांत वसंत क्रांतीचे वारे वाहू लागले होते, तेव्हा असे वाटत होते की, या सर्व देशांत लोकशाही प्रस्थापित होईल. पण, जेव्हा स्थिती बिघडली तेव्हा अल् कायदाला संधी मिळाली. आता त्यांचा नवा नारा आहे, इस्लामवर आधारित अल् कायदाचे साम्राज्य.
जस्मीन क्रांतीने इजिप्तसह अल्जिरिया, मोरोक्को, ट्युनिशियाच नव्हे, तर सीरिया व लिबिया यांनाही प्रभावित केले. तेथे निवडणुकाही झाल्या, सरकारे बनली, पण लवकरच तेथे पुन्हा अराजकता पसरली. अल् कायदाने संदेश दिला की, इस्लामी देशांचे भले यातच आहे की, ज्या इस्लामी संघटना शरीयत आणि इस्लामी दर्शनाच्या आधारावर बनल्या आहेत, त्याच तुमचे भले करू शकतात. यात कोणतेही परिवर्तन होऊच शकत नाही. त्यांना हे मानावेच लागेल की, इस्लामी देश आपल्या इस्लामी व्यवस्थेनुसार सरकारे बनवतील, शरीयतचा मार्ग अवलंबून मुसलमानांना तो मार्ग दाखवतील, जो इस्लामने सांगितला आहे.
अल् कायदाच्या या वाढत्या कारवाया पाहता असे म्हणता येईल की, सध्याचे २०१४ हे वर्ष या संघटनेसाठी महत्त्वपूर्ण असेल. या वर्षात संघर्ष अधिकच तीव्र होईल. अल् कायदा म्हणतो, जे नेते अमेरिकासमर्थक आहेत, त्यांना शस्त्रे खाली ठेवावीच लागतील. कारण, हे युद्ध सत्तेसाठी नसून येणार्‍या काळात मुस्लिम देशांचा एक संघ बनेल. आज जी ६३ मुस्लिम राष्ट्रे आहेत, त्यांचा एक राष्ट्रसंघ असेल व आपल्या सुरक्षेची व्यवस्थाही असेल. आजपर्यंत जगात दोन ध्रुव होते. पण, आता इस्लामी संघ एक मोठी शक्ती म्हणून तिसर्‍या शक्तीच्या रूपात अवतरणार आहे. अमेरिका ज्या संघाच्या गोष्टी करतो, तो राष्ट्रसंघ आपल्या संघापुढे ठेंगू होऊन जाईल. रशियाची स्थिती तर यापेक्षाही कमकुवत होईल. क्षेत्रफळ आणि प्राकृतिक स्रोतांचा विचार केल्यास जगात आपली बरोबरी कुणीही करू शकणार नाही. इराकची दोन शहरे फलोजा आणि रमावीने जेव्हा आपल्याच सरकारविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला, अमेरिकेने मूक दर्शकाची भूमिका घेतली. ही बाब इराकची अंतर्गत बाब आहे, अमेरिकेची नाही, असे त्यांनी घोषित केले. अल् कायदाची इराकमधील घुसखोरी अमेरिकेला महागात पडणार आहे. त्याचे ज्या इस्लामी देशांवर वर्चस्व आहे, ते एक दिवस त्यांना गमवावे लागेल. कारण, अल् कायदा इस्लामी राष्ट्र नव्हे, तर राष्ट्रांचा संघ बनवायला निघाला आहे. जो देश या समूहाचा सदस्य असेल, अल् कायदा त्याला आपल्या परीने सुरक्षा प्रदान करेल.
इराकच्या दोन शहरांवर अल् कायदाने कब्जा करताच, अमेरिकेने आपल्या फौजांनी तेथून निघून जाण्याचा आदेश दिला होता. हे आत्मसमर्पण दर्शवीत आहे की, अमेरिका अल् कायदाला किती घाबरत आहे. राजकीय पंडितांचे म्हणणे आहे की, अमेरिकेला एवढे लाचार होताना कधीही बघितले नाही. आता अल् कायदाने इराकच्या फलोजापासून सीरियाच्या हलबपर्यंत ४०० चौरस मैल भागावर आपला झेंडा रोवला आहे.
वास्तविकता ही आहे की, अमेरिकेने जस्मीन क्रांतीच्या नावावर दुहेरी भूमिका घेतली नसती, तर तिला हे दिवस पाहावे लागले नसते. इजिप्तमध्ये इखवानची सत्ता अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या पचनी पडलेली नाही. त्याचे परिणाम समोर दिसतच आहेत. इजिप्तमध्ये इखवान पुन्हा संकटात आहे. तेथे अनिश्‍चितता वाढली आहे. लोक पुन्हा रस्त्यांवर आले आहेत. शेकडो लोक शरणार्थी बनले आहेत. यामुळे तेथे अल् कायदा पुन्हा हिरो बनला आहे. आता बातम्या अशा येत आहेत की, इखवानच्या एका गटाने अल् कायदासोबत हातमिळवणी केली आहे. एवढेच नव्हे, तर फ्री सीरिया आर्मीसोबत अन्नसर या अल् कायदा समर्थक गटानेही युती केली आहे. याचा अर्थ, आतापर्यंत जी आग सीरियात धुमसत होती, त्याच्या ज्वाळा इजिप्तपर्यंतही भाग आपल्या कवेत घेतील. अरब जगतातील शिया-सुन्नी संघर्षामुळे अल् कायदाला नवजीवनच मिळाले आहे. जोपर्यंत या दोन गटांत भांडणे सुरू असतील, इराक आणि सीरियातील आग शांत होणार नाही.
तिकडे अल् कायदाच्या या कारवायांमुळे इराण चिंताग्रस्त आहे, तर पाकिस्तान हैराण आहे. इराकमध्ये यादवीसदृश स्थिती आहे. सीरियाची स्थिती हलाखीची झाली आहे. अल्जिरिया असो वा सोमालिया, सुदान असो की येमेन, सर्व ठिकाणी अल् कायदाचा वावर आहे. आता अल् कायदाचे आगामी लक्ष्य इराकची सत्ता ताब्यात घेण्याचे आहे. अल् कायदा इराकमध्ये सुन्नींच्या समर्थनार्थ उभा ठाकला आहे. आता तर सोमालियाच्या अल् शबाब या अतिरेकी संघटनेचा अल् कायदात विलय झाला आहे. इराण सर्व इस्लामी देशांना आव्हान करीत आहे की, अल् कायदाचे कंबरडे मोडून इस्लामी जगताला अराजकता आणि रक्तरंजित संघर्षापासून मुक्त करण्याची गरज आहे. जर असे घडले नाही, तर मग अल् कायदासोबत विश्‍वयुद्धासारखीच लढत द्यावी लागेल, यात आश्‍चर्य वाटायला नको.

Posted by : | on : 24 Mar 2014
Filed under : मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन, संवाद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g