Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
लखनऊ, (११ मार्च) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत. एआय वापरून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री औषधाचा प्रचार करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री मधुमेहाच्या औषधाचा प्रचार करताना दाखवले जात आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एआय वापरून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री औषधाची जाहिरात करताना आणि भारतात मधुमेहावर विजय मिळवला असल्याचा दावा करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, डीजीपी...
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 2nd, 2024
नवी दिल्ली, (०२ मार्च) – आगामी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे...
2 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 6th, 2024
नवी दिल्ली/लखनऊ, (०६ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या १० जागा रिक्त होणार असून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जगांसाठी ३५ नावांची यादी तयार केल्याचे वृत्त आहे. यामध्ये, आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि राम कथाकार, कवी कुमार विश्वास यांच्यासह सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचीही चर्चा आहे. यासंदर्भात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपाच्या समितीची बैठक झाली असून, त्यात राज्यसभेवर पाठवायच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली आहे. दुसरीकडे गाजियाबाद मतदारसंघातून कुमार...
6 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
लखनौ, (०३ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी विधानसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प भगवान श्री राम यांना समर्पित केला आणि म्हटले की, राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प हा सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी आर्थिक दस्तऐवज आहे. अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या सरकारचा हा आठवा अर्थसंकल्प असून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित अर्थसंकल्प असतो....
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
– श्री रामलला शिल्पकार म्हैसूरचे अरुण योगीराज यांच्या भावना, अयोध्या, (२२ जानेवारी) – प्रभू रामाचे बालस्वरूप असलेल्या रामललाची मूर्ती बनवून अरुण योगीराज खूप खास झाले आहेत. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेली रामललाची मूर्ती अयोध्येतील राम मंदिरात स्थापनेसाठी निवडण्यात आली आहे. योगीराजांनी बनवलेली रामललाची नवीन ५१ इंची मूर्ती गेल्या गुरुवारी मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली. या प्रसंगी शिल्पकार अरुण योगीराज यांनी सोमवारी सांगितले की, मला वाटते की मी या पृथ्वीवरील सर्वात...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची साथ लाभली. पंतप्रधान मोदी आणि मोहनजी भागवत यांनी मंत्रघोषात पूजा केली. यावेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन देखील गर्भगृहात उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू रामललाचे पहिले भव्य अलौकिक चित्र समोर आले आहे. गर्भगृहातील पूजेदरम्यान शंखांचा नाद आणि मंत्रोच्चारामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले होते. शहनाई आणि इतर शास्त्रीय वाद्यांसह...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 19th, 2024
लखनौ, (१८ जानेवारी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेमी कंडक्टर धोरण २०२४ सोबतच राज्यात तीन नवीन खाजगी विद्यापीठांच्या स्थापनेलाही मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच गोरखपूरच्या मुंडेरा बाजार नगर पंचायतीचे नाव बदलून चौरी-चौरा करण्याचा प्रस्तावही मंत्रिपरिषदेने मंजूर केला. राज्याचे अर्थमंत्री सुरेश खन्ना, उच्च शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय आणि साखर उद्योग आणि ऊस विकास मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. एका निवेदनानुसार,...
19 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 4th, 2024
देवरिया, (०४ जानेवारी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर देवरिया जिल्ह्यातील रुद्रपूर कोतवाली पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्रपूर कोतवाली प्रभारी महेंद्रकुमार चतुर्वेदी यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०५ (२) आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रुद्रपूर कोतवाली परिसरातील फतेहपूर गावातील लेहरा टोला...
4 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
अयोध्या, (०३ डिसेंबर) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी अयोध्येला पोहोचले. त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि राज्यमंत्री जनरल व्हीके सिंह हेही उपस्थित होते. आपल्या दौर्यात मुख्यमंत्री योगींनी रामललाचे दर्शन आणि पूजा केली. यानंतर त्यांनी अयोध्येतील निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय श्री राम विमानतळाचीही पाहणी केली. रामलल्लाच्या अभिषेकपूर्वीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी २ डिसेंबरला अयोध्येत पोहोचले. अयोध्या दौर्यादरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी सर्वप्रथम हनुमानगढी मंदिरात जाऊन पूजा केली. त्यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डयन...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
हैदराबाद, (२६ नोव्हेंबर) – भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तेत आल्यास हैदराबादचे नामकरण भाग्यनगर केले जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सांगितले. काँग्रेसने हैदराबादला आज जे आहे ते बनवले, भाजप हैदराबादला पुन्हा भाग्यनगर बनवेल. देवी भाग्यलक्ष्मी येथे आहे आणि आम्ही त्यांच्या नावाने शहराचे नाव ठेवण्यास कटिबद्ध आहोत. तेलंगणातील सर्व रामभक्तांसाठी ही आमच्या पक्षाची भेट असेल, असे योगी आदित्यनाथ यांनी कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील रॅलीत म्हंटले आहे . यूपीच्या...
26 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 16th, 2023
नवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – एकीकडे टीम इंडियाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलचे तिकीट बुक केले आहे. तर या सामन्यात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी करत ७ विकेट्स घेतल्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शमीच्या दमदार गोलंदाजीचे कौतुक केले आहे. शमीच्या या अप्रतिम पराक्रमावर पीएम मोदी ट्विटरवर म्हणाले, आजची उपांत्य फेरी अधिक खास बनली ती चमकदार वैयक्तिक कामगिरीमुळे. मोहम्मद शमीची शानदार गोलंदाजी क्रिकेटप्रेमींच्या भावी पिढ्यांच्या स्मरणात...
16 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गुरुवारी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अनेक राज्यांच्या पक्ष नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, हरियाणा आणि तेलंगणा या राज्यांतील भाजपचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन...
4 Nov 2023 / No Comment / Read More »