किमान तापमान : 26.74° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 40 %
वायू वेग : 4.33 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
23.87°से. - 30.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.16°से. - 28.16°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.47°से. - 29.09°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.93°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.99°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.66°से. - 29.04°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादलहैदराबाद, (२६ नोव्हेंबर) – भारतीय जनता पक्ष (भाजप) सत्तेत आल्यास हैदराबादचे नामकरण भाग्यनगर केले जाईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी सांगितले. काँग्रेसने हैदराबादला आज जे आहे ते बनवले, भाजप हैदराबादला पुन्हा भाग्यनगर बनवेल. देवी भाग्यलक्ष्मी येथे आहे आणि आम्ही त्यांच्या नावाने शहराचे नाव ठेवण्यास कटिबद्ध आहोत. तेलंगणातील सर्व रामभक्तांसाठी ही आमच्या पक्षाची भेट असेल, असे योगी आदित्यनाथ यांनी कुमुरम भीम आसिफाबाद जिल्ह्यातील रॅलीत म्हंटले आहे .
यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी २०२० मध्ये नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान असाच कॉल दिला होता जिथे त्यांनी हैदराबादचे नाव भाग्यनगर ठेवावे असे सांगितले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे आरोप केला की तेलंगणातील मुस्लिम आरक्षण हा डॉ. बी. आर. आंबेडकरांनी बनवलेल्या राज्यघटनेचा अपमान आहे. मुस्लिमांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक आहे आणि ते कोणत्याही किंमतीत लागू होऊ दिले जाऊ नये, असे ते म्हणाले. परंतु, बीआरएस आणि काँग्रेस या दोघांनाही देशाला नवीन विभाजनाकडे घेऊन जायचे आहे, असा आरोप त्यांनी केला. तुष्टीकरणाच्या राजकारणाचा घाणेरडा खेळ आता तेलंगणात पाहायला मिळतो. बीआरएस सरकारने मुस्लिम आरक्षणाची घोषणा केल्यावर एखादे सरकार समाजात फूट पाडण्यासाठी किती टोकाला जाऊ शकते ते आम्ही तेलंगणात पाहिले आहे, असे आदित्यनाथ म्हणाले.
त्यांनी असा दावा केला की मुस्लिम आरक्षण ही संकल्पना एससी, एसटी आणि बीसींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र आहे आणि डॉ बी.आर आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा अनादर आहे. तेलंगणात लोकांना भाजपला पाठिंबा देण्याचे आवाहन करून, त्यांनी सांगितले की, निवडून आल्यास, भगवा पक्ष असंवैधानिक धार्मिक आरक्षण काढून टाकेल आणि ओबीसी, एससी आणि एसटी ला लाभ देईल. योगींनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली आणि म्हणाले की, राज्य सरकारने तरुण, शेतकरी आणि महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण न करून त्यांची फसवणूक केली आहे.