किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैद्राबाद, (२६ नोव्हेंबर) – तेलंगणात सरकार स्थापन केल्यानंतर राहुल गांधींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह काँग्रेस पक्ष तुमच्या बँक खात्यात ५,००० रुपये जमा करेल. शेतकर्यांना एकरी १५ हजार रुपये मोफत वीज दिली जाणार आहे. मजुरांना दरवर्षी १२ हजार रुपये दिले जातील. ज्यांच्याकडे घरे नाहीत त्यांच्यासाठी काँग्रेस एक जबरदस्त योजना आणणार आहे.
सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, राज्यातील आठ हजार शेतकर्यांनी आत्महत्या का केल्या? तुमच्या राज्यातील आमदारच दलित बंधू योजनेत कपात करत आहेत. भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार तेलंगणा राज्यात आहे. याचा फटका फक्त तेलंगणातील लोकांनाच सहन करावा लागला, याचे वाईट वाटते.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही जनतेला सहा आश्वासने दिली आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार येताच या आश्वासनांचे कायद्यात रूपांतर केले जाईल. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा संदर्भ देत ते म्हणाले की, महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा २५०० रुपये वर्ग केले जातील. राज्यात काँग्रेसचे सरकार येताच गॅस सिलिंडरचे दर कमी केले जातील. तुम्हा सर्वांना ५०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळेल.