किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– पश्चिम बंगाल सरकारला धक्का,
कोलकाता, (२६ नोव्हेंबर) – मिरवणुका, रॅली आणि सभा हे पश्चिम बंगालमध्ये नियमित वैशिष्ट्य आहे, असे निरीक्षण नोंदवत कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी एकलपीठाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. एकलपीठाने भाजपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २९ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यास आणि संबोधित करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे.
मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम् यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने एकलपीठाच्या २० नोव्हेंबरच्या आदेशाला आव्हान देणारे पश्चिम बंगाल सरकारचे अपील फेटाळून लावले. मिरवणुका, रॅली आणि सभा हे बंगालचे विशेषतः कोलकाताचे वैशिष्ट्य आहे, याची दखल घेत मुख्य न्यायाधीशांनी एकलपीठाचा आदेश कायम ठेवला. २९ नोव्हेंबर रोजी मध्य कोलकाता येथील एस्प्लानेड येथील व्हिक्टोरिया हाऊस समोर भाजपाला जाहीर सभा घेण्याची परवानगी दिली होती. न्या. हिरणमय भट्टाचार्य यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने असे निरीक्षण केले की, अशी अनेक उदाहरणे न्यायालयाच्या निदर्शनास आली आहेत, जिथे रॅली, सभा आणि आंदोलने झाली आहेत, ज्यासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही. राज्य सरकारने एकलपीठाच्या आदेशाला आव्हान देत विभागीय खंडपीठासमोर अपील केले होते. अमित शाह संबोधित करणार असलेली २९ नोव्हेंबरची सभा घेण्याचा अर्ज कोलकाता पोलिसांनी फेटाळल्याच्या विरोधात भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.