किमान तापमान : 30.08° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.46 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
27.24°C - 31.99°C
sky is clear27.63°C - 30.65°C
sky is clear27.77°C - 31.02°C
sky is clear28.29°C - 31.38°C
sky is clear28.45°C - 30.48°C
sky is clear27.86°C - 30.01°C
sky is clearनवी दिल्ली/लखनऊ, (०६ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या १० जागा रिक्त होणार असून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जगांसाठी ३५ नावांची यादी तयार केल्याचे वृत्त आहे. यामध्ये, आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि राम कथाकार, कवी कुमार विश्वास यांच्यासह सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचीही चर्चा आहे.
यासंदर्भात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपाच्या समितीची बैठक झाली असून, त्यात राज्यसभेवर पाठवायच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली आहे. दुसरीकडे गाजियाबाद मतदारसंघातून कुमार विश्वास लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचीही चर्चा आहे. अशा स्थितीत विश्वास नेमक्या कोणत्या सभागृहात जाणार? यावरून राजकीय चर्चेला ऊत आला आहे.
राज्यसभेत रिक्त होत असलेल्या १० जागांपैकी ७ जागा भारतीय जनता पार्टीच्या खात्यात आहेत. उर्वरीत जागांपैकी २ जागा समाजवादी पक्षाला मिळणार आहेत. तर, शेवटची जागा जिंकण्याची संधी भाजपा आणि समाजवादी पक्षाकडेही आहे. भाजपा आपला आठवा उमेदवार या निवडणुकीत उतरवू शकते.