|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.51° C

कमाल तापमान : 28.83° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 4 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.83° C

Weather Forecast for
Saturday, 27 Apr

28.61°C - 32.02°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.87°C - 32.93°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29°C - 32.52°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.78°C - 32.42°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 01 May

27.84°C - 30.17°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.21°C - 29.62°C

sky is clear

जन धन योजनेची डिजिटल परिवर्तनाद्वारे आर्थिक क्रांती

जन धन योजनेची डिजिटल परिवर्तनाद्वारे आर्थिक क्रांती-५० कोटींहून अधिक बँक खाती, नवी दिल्ली, (२८ ऑगस्ट) – जन धन योजना आणि डिजिटल परिवर्तनामुळे देशात आर्थिक समावेशात क्रांती घडून आली आहे. याद्वारे ५० कोटींहून अधिक लोक औपचारिक बँकिंग प्रणालीमध्ये जोडले गेले, ज्यांच्या संचयी ठेवी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सांगितले. प्रधानमंत्री जन धन योजनेच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त, सीतारामन म्हणाल्या की, ५५.५ टक्के बँक खाती महिलांनी उघडली आहेत आणि ६७ टक्के खाती...28 Aug 2023 / No Comment /

हप्ता किती वाढणार? ते ग्राहकांना कळवा !

हप्ता किती वाढणार? ते ग्राहकांना कळवा !-रिझर्व्ह बँकेने दिले कडक निर्देश, मुंबई, (१२ ऑगस्ट) – गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून व्याजदरात अडीच टक्क्यांची वाढ झाली आहे. परिणामी, गृह, वाहन, वैयक्तिक, व्यवसाय कर्ज अशा विविध प्रकारच्या विद्यमान ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदरात आणि पर्यायाने मासिक हप्त्यांत वाढ झाली आहे. तर काही बँकांनी ग्राहकांच्या कालावधीत वाढ केली आहे. मात्र, या व्याजदर वाढीनंतर ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदरात किती वाढ झाली आहे व त्यांचा मासिक हप्ता कसा वाढला आहे, याची व्यवस्थित माहिती बँकांनी आपल्या...12 Aug 2023 / No Comment /

बँकांमधील बेवारस पडून आहेत ५,७२९ कोटी रुपये

बँकांमधील बेवारस पडून आहेत ५,७२९ कोटी रुपये– रक्कम योग्य व्यक्तीला मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा विशेष उपक्रम, मुंबई, (२७ जुलै) – बँकांमध्ये ५,७२९ कोटी रुपये जमा असून, या रकमेला कुणीच वाली नाही. गेल्या पाच वर्षांत विविध बचत खाती आणि एफडीमध्ये जमा केलेल्या पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावेदार सापडत नाहीत. हे पैसे कुणाचे, हे शोधण्याचे काम सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने ही रक्कम लवकरात लवकर निकाली काढण्यास सांगितले आहे. मागील पाच वर्षांत दावा न केलेल्या ठेवी लवकर निकाली...27 Jul 2023 / No Comment /

जूनमध्ये १२ टक्क्यांनी वाढले जीएसटी संकलन

जूनमध्ये १२ टक्क्यांनी वाढले जीएसटी संकलन– केंद्रीय अर्थ मंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, (०२ जुलै) – जून महिन्यात वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलन १२ टक्क्यांनी वाढून १.६१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शनिवारी दिली. सहा वर्षांपूर्वी अप्रत्यक्ष करपद्धत लागू झाल्यानंतर एकूण जीएसटी संकलनाने चौथ्यांदा १.६० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ मधील पहिल्या तिमाहीत सरासरी जीएसटी संकलन अनुक‘मे १.१० लाख कोटी, १.५१ लाख कोटी आणि १.६९...2 Jul 2023 / No Comment /

दुहेरी ताळेबंदाच्या समस्येतून मुक्त झाली अर्थव्यवस्था: निर्मला सीतारामन्

दुहेरी ताळेबंदाच्या समस्येतून मुक्त झाली अर्थव्यवस्था: निर्मला सीतारामन्– बँका आता फायद्यात, नवी दिल्ली, (०१ जुलै) – मोदी सरकारच्या ठोस प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्था आता बँका आणि कॉर्पोरेट्सच्या दुहेरी ताळेबंद समस्येतून बाहेर पडली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शनिवारी केले. २०२२-२३ मध्ये सार्वजनिक बँकांचा फायदा वाढून तो १.०४ लाख कोटी रुपये झाला. २०१४ च्या तुलनेत हा फायदा तिप्पट आहे, असे सीतारामन् यांनी पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँकेच्या येथील कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन करताना सांगितले. दुहेरी ताळेबंद हे एकाचवेळी...1 Jul 2023 / No Comment /

चलनातून २००० च्या नोटा काढण्याची मुख्य कारणे!

चलनातून २००० च्या नोटा काढण्याची मुख्य कारणे!नवी दिल्ली, (२० मे) – भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा चलनातुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे समर्थन देशाचे माजी आर्थिक सल्लागार डॉ.कृष्णमूर्ती सुब्रह्मण्यन यांनी केले आहे. सुब्रमण्यम म्हणाले की, बहुतेक छाप्यांमध्ये २००० च्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत, कारण या नोटांचा साठा करण्यासाठी वापर केला जात होता. डॉ. कृष्णमूर्ती हे २०१८ ते २०२१ पर्यंत मुख्य आर्थिक सल्लागार होते. हे पाऊल महत्त्वाचे का आहे, याची सहा...20 May 2023 / No Comment /

बँकांमधील ३५ हजार कोटींची बेवारस रक्कम आरबीआयला सुपूर्द

बँकांमधील ३५ हजार कोटींची बेवारस रक्कम आरबीआयला सुपूर्दनवी दिल्ली, (०४ एप्रिल) – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या १०.२४ कोटी खात्यांमध्ये फेब्रुवारी २०२३ पर्यंत ३५,०१२ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. ही खाती गेल्या १० वर्षांपासून हाताळण्यात आली नाही. या खात्यांमधील दावा न केलेली रक्कम बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे हस्तांतरित केली आहे. दावा न केलेली रक्कम अशा खात्यांमधील असते, जी १० वर्षांपेक्षा जास्त काळ हाताळली जात नाही. मार्च २०२२ पर्यंत बँकांमध्ये अशा स्वरूपाची ४८,२६२ कोटी रुपयांची रक्कम होती. अर्थराज्यमंत्री भागवत कराड...4 Apr 2023 / No Comment /

देशाने वाईट काळ मागे सोडला

देशाने वाईट काळ मागे सोडला– आरबीआय गव्हर्नर दास यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, (१८ मार्च) – देशातील महागाईवरून विरोधक केंद्रातील भाजपा सरकारवर सातत्याने टीका करीत असतात. यातच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातील महागाईबाबत मोठा दावा केला आहे. भारताने महागाईचा वाईट काळ मागे सोडला आहे. आपली अर्थव्यवस्था स्थिर आहे, असे ते म्हणाले. भारताचे परदेशी कर्ज मर्यादेत आहे आणि डॉलरचा भाव वाढल्याने भारतावर कोणतीही अडचण येणार नाही. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गने चालू वर्षात 7 टक्के आणि...18 Mar 2023 / No Comment /

आयकर विभागातर्फे ई-व्हेरिफिकेशनसाठी ६८,००० प्रकरणे

आयकर विभागातर्फे ई-व्हेरिफिकेशनसाठी ६८,००० प्रकरणेनवी दिल्ली, (१४ मार्च) – आयकर विभागाने २०१९-२० या आर्थिक वर्षात आयकर रिटर्न (आयटीआर) मध्ये नॉन-डिक्लोजर किंवा कम-डिक्लोजर संदर्भात ई-पडताळणीसाठी सुमारे ६८,००० प्रकरणे हाती घेतली आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्रायोगिक तत्त्वावर आर्थिक व्यवहारांचे ई-सत्यापन सुरू करण्यासाठी हे प्रकरण हाती घेतले आहे. माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाने सांगितले की, २०१९-२० या आर्थिक वर्षातील ६८,००० आयटीआर प्रकरणांशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती सीबीडीटीने आयकरदात्यांकडून ई-सत्यापनासाठी मागवली आहे, ज्यामध्ये ई-सत्यापन करण्यात आले आहे. सुमारे ३५,०००...14 Mar 2023 / No Comment /

३१ मार्च अखेरची तारीख, करबचतीसाठी शेवटची संधी!

३१ मार्च अखेरची तारीख, करबचतीसाठी शेवटची संधी!नवी दिल्ली, (१२ मार्च) – आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच मार्च. बँकांपासून अनेक संस्थांमध्ये मार्चमध्ये क्लोजिंगची कामे सुरू असतात. त्यामुळे हा महत्त्वाचा महिना समजला जातो. सरकारने अनेक गोष्टी अद्ययावत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे तसेच करबचतीसाठी गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे. या कालावधीत ही कामे केले नाही तर नागरिकांना दंडही भरावा लागू शकतो. पॅन-आधार लिंक तुम्ही अजूनपर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर हे काम लवकर पूर्ण करा....12 Mar 2023 / No Comment /

बिल गेट्स यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची घेतली भेट

बिल गेट्स यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची घेतली भेटमुंबई, (२८ फेब्रुवारी ) – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आज मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत त्यांनी रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात जाऊन गव्हर्नर शक्तीकांत दास यांची भेट घेतली. या बैठकीची छायाचित्रेही आरबीआयने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. आरबीआयने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, बिल गेट्स यांनी आज मुंबईत राज्यपालांची भेट घेतली आणि अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक यांच्याशी भेट घेतल्यानंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ट्विट करून या बैठकीची माहिती दिली....28 Feb 2023 / No Comment /

वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय

वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णयनवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी ) – जीएसटी परिषदेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत काही वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा तर, काही वस्तूंवरील जीएसटी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान भवनात झालेल्या बैठकीत यासंदर्भात अनेक निर्णय घेण्यात आले. त्यानंतर एका पत्रपरिषदेत सीतारामन् यांनी याबाबतची माहिती दिली. तरल गुळ पावडरवरील जीएसटी शून्य टक्के करण्यात आला; मात्र हा गुळ पॅकिंगमध्ये आणि त्यावर लेबल असेल तर, त्यावर ५ टक्के जीएसटी लागणार आहे....18 Feb 2023 / No Comment /