किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.14° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.25 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.9°से. - 30.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल27.29°से. - 30.38°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.87°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.89°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल26.05°से. - 29.46°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.31°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१२ मार्च) – आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच मार्च. बँकांपासून अनेक संस्थांमध्ये मार्चमध्ये क्लोजिंगची कामे सुरू असतात. त्यामुळे हा महत्त्वाचा महिना समजला जातो. सरकारने अनेक गोष्टी अद्ययावत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे तसेच करबचतीसाठी गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी आहे. या कालावधीत ही कामे केले नाही तर नागरिकांना दंडही भरावा लागू शकतो.
पॅन-आधार लिंक
तुम्ही अजूनपर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक केले नसेल, तर हे काम लवकर पूर्ण करा. तुम्ही ३१ मार्चपर्यंत हे काम न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्कि‘य होईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून ३० जून २०२२ पासून पॅन आधारशी लिंक केल्यास एक हजार रुपये विलंब शुल्क आकारले जात आहे.
गुंतवणूक करण्याची संधी
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी तुम्ही अद्याप गुंतवणूक केली नसेल तर, लवकर हे काम पूर्ण करा. तुम्ही पीपीएन, सुकन्या समृद्धी योजना, ५ वर्षांची एफडी, ईएलएसएस इत्यादींमध्ये गुंतवणूक करून कलम ८०सी अंतर्गत कर सवलत मिळवू शकता. यासाठी ३१ मार्चपर्यंत या योजनेत गुंतवणूक करावी.
पीएम वय वंदना
कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना पीएम वय वंदना योजनेत गुंतवणूक करायची असले तर, ती त्यांना ३१ मार्चपर्यंत करता येऊ शकते. ही योजना पुन्हा सुरू राहणार की नाही, या संदर्भात सरकारने अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही ६० वर्षे व त्यापुढील नागरिकांसाठी पेन्शन योजना आहे.
अमृत कलश
भारतीय स्टेट बँकेची नवीन मुदत ठेव योजना म्हणजेच अमृत कलश योजना या महिन्यात संपणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ७.६ टक्के तर, इतरांना ७.१ टक्के व्याज दिले जात आहे.
म्युच्युअल फंडात नॉमिनेशन
तुम्ही म्युच्युअल फंड नॉमिनेशन प्रक्रिया अजून पूर्ण केली नसेल तर, हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. यासाठी सर्व फंड हाऊसेसने ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. तुम्ही असे न केल्यास तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवले जाऊ शकते.