किमान तापमान : 28.63° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.84°से. - 30.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल27.29°से. - 30.38°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.87°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.89°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल26.05°से. - 29.46°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.31°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलगाझीपूर, (१२ मार्च) – गाझीपूरमध्ये पंतप्रधानांचा ड्रीम प्रोजेक्ट ’रेल कम रोड ब्रिज’वर ३५ किमी. च्या वेगाने इंजिन चालवून चाचणी घेण्यात आली. यावर ही ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावू शकेल. त्याची किंमत १४०० कोटी आहे. गाझीपूर सिटी स्टेशन ते ताडी घाट या नवीन रेल्वे मार्गावर धावून इंजिनची चाचणी घेण्यात आली.
पीएम मोदींनी १४ नोव्हेंबर २०१६ रोजी गाझीपूर येथून रेल्वे कम रोड ब्रिजची पायाभरणी केली होती. १४०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्या रेल्वे कम रोड पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आरबीएनएलचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणाले, पहिल्या टप्प्यातील ही पहिली चाचणी आहे. त्याची अंतिम चाचणी २८ मार्च रोजी होणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये या प्रकल्पाचा समावेश आहे. शनिवारी डिझेल लोकोमोटिव्ह चालवून त्याची चाचणी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यातील चाचणीमध्ये डिझेल लोकोमोटिव्ह ३५ किमी वेगाने चालवण्यात आले. ठतछङ प्रकल्प व्यवस्थापक यांनी सांगितले की, गाझीपूरसाठी आजचा दिवस अभिमानास्पद आहे. वर्षानुवर्षे प्रस्तावित असलेला हा प्रकल्प आज पूर्ण झाला.
गाझीपूर सिटी स्टेशन ते ताडीघाटापर्यंत बांधण्यात आलेले नवीन स्टेशन ट्रॅकला जोडण्यात आले आहे. रेल्वे कम रोड ब्रिजची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, ट्रेन ताशी १६० किलोमीटर वेगाने धावू शकेल. परंतु, सध्या या मार्गावर ताशी केवळ ११० किलोमीटर वेगाने धावण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी पहिली चाचणी ताशी ३५ किलोमीटर वेगाने डिझेल लोकोमोटिव्ह चालवून घेतली जाईल. हा प्रकल्प दोन भागात विभागलेला आहे, एक भाग मऊ ते गाझीपूर आणि दुसरा गाझीपूर शहर ते ताडीघाट असा आहे. गाझीपूर शहर ते ताडीघाटापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर ताडीघाट ते गाझीपूर घाटापर्यंतचे काम अद्याप प्रलंबित आहे. या दोघांचा समावेश करून या प्रकल्पाची किंमत १४०० कोटी आहे. २८ मार्च रोजी आयुक्त रेल्वे सुरक्षा यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. यासाठी तपासणीपूर्वी आणखी अनेक तपासण्या आहेत.