किमान तापमान : 28.15° से.
कमाल तापमान : 28.71° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.71° से.
27.47°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१२ मार्च) – पंजाबमधील अजनाला हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादाविरोधात कडक संदेश दिला आहे. देशातील दहशतवादी घटनांना कठोरपणे सामोरे जाईल. अमित शाह म्हणाले की, देशाच्या कोणत्याही भागात फुटीरतावाद, दहशतवाद आणि देशविरोधी कारवाया झाल्यास कडक कारवाई केली जाईल. आज सकाळी हैदराबादमध्ये उखडऋ च्या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह बोलत होते.
पंजाबमधील अमृतसरमध्ये ’वारीस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्यांच्या समर्थकांनी तुफान सिंगच्या अटकेच्या निषेधार्थ अजनाळा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा पोलीस जखमी झाले असून त्यांना अजनाळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमृतपाल सिंग यांनी दावा केला की, त्यांचा सहकारी तुफान सिंग याला अटक करण्यात आली असून, तो निर्दोष आहे. त्याचा छळ केला जात आहे. एफआयआरमधून नाव न काढल्यास पोलीस ठाण्याचा घेराव घालण्याची धमकी त्यांनी दिली होती. अमृतपाल पाल यांच्या समर्थकांनी तलवारी आणि बंदुकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले आणि पोलिस स्टेशनला घेराव घातला. अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. तो खलिस्तानी समर्थक मानला जातो. अमृतपाल यांना सप्टेंबरमध्ये संस्थेचे प्रमुख बनवण्यात आले आहे. ’वारीस पंजाब दे’ संघटनेची स्थापना अभिनेता संदीप सिंग उर्फ दीप सिद्धूने केली होती. २६ जानेवारी २०२१ रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या दंगलीत दीप सिद्धू हा मुख्य आरोपी होता.