किमान तापमान : 27.9° से.
कमाल तापमान : 27.96° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 3.4 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.96° से.
27.78°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल-ब्रिटिश सरकारवर टीका करणार्या अँकरला बीबीसीने निलंबित केले,
नवी दिल्ली, (१२ मार्च) – ब्रिटिश सरकारवर टीका केल्याने बीबीसीने आपल्या अँकरला निलंबित केले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी बीबीसीचे स्टार अँकर गॅरी लिनकर यांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटींबद्दल निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाकूर यांनी ट्विट केले की, ’पत्रकारिता निःपक्षपातीपणा आणि स्वातंत्र्याबाबत मोठे दावे करणार्या इइउ ने आपल्या स्टार अँकरची सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी निलंबित केली. बीबीसीचा संदर्भ देताना ठाकूर म्हणाले, बनावट तथ्यांवर आधारित खोटी माहिती पसरवणार्यांकडून नैतिकता किंवा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी उभे राहण्याचे धाडस असण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही.
ठाकूर यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा जानेवारी महिन्यात बीबीसीच्या एका माहितीपटावर सरकारने बंदी घातली होती. बीबीसी मेड इंडिया: २००२ गुजरात दंगलींवरील मोदी प्रश्न माहितीपट. केंद्र सरकारने बीबीसीच्या माहितीपटाला अपप्रचार म्हणत त्यावर बंदी घातली होती. या माहितीपटावरून भारतात बराच गदारोळ झाला होता. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, माहितीपटात पक्षपातीपणा आणि वस्तुनिष्ठतेचा अभाव असून वसाहतवादी मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. याउलट, बीबीसीने माहितीपटाचे समर्थन केले आणि त्याला ’सर्वोच्च संपादकीय मानकांचा कठोरपणे संशोधन केलेला माहितीपट’ म्हटले.