किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकोलंबो, २८ नोव्हेंबर – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मालदीवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या बैठकीत त्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली.
भारत-श्रीलंका-मालदीव या त्रिपक्षीय सामुद्री बैठकांतर्गत त्यांनी येथे ही चर्चा केली आहे. सामुद्री सुरक्षा आणि सहकार्य या विषयावरील तीन देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या चौथ्या बैठकीचे आयोजन येथे करण्यात आले आहे. ही बैठक सहा वर्षांनी झाली असून, यापूर्वी २०१४ साली नवी दिल्ली येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संरक्षण आणि सुरक्षेच्या मुद्यावर द्विपक्षीय भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि मालदीवच्या संरक्षण मंत्री मारिया दीदी यांच्यात तपशीलवार चर्चा झाली, असे ट्विट भारत आणि मालदीवच्या उच्चायोगाने केले आहे. त्रिपक्षीय बैठकीसाठी डोवाल शुक्रवारी येथे पोहोचले आहेत. विविध विषयांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय चर्चेत हिंद महासागर प्रदेशातील सामुद्री सुरक्षाविषयक जागरूकता, कायदेशीर शासन, शोध व बचाव, सागरी प्रदूषण प्रतिसाद, माहितीचे आदान-प्रदान करणे, चाचेगिरी आणि अवैध व्यापारावर आळा घालण्याचा समावेश आहे. हिंद महासागरातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील हा त्रिपक्षीय चर्चेचा मंच अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी व्यक्त केली होती.