किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलइस्रायलच्या सहभागाचे पुरावे सापडल्याचा दावा,
तेहरान, २८ नोव्हेंबर – इराणचे वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली. या घटनेनंतर इराण आणि इस्रायलमधील तेढ वाढली आहे. हत्येमध्ये इस्रायलचा सहभाग असल्याचे पुरावे सापडल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी केला आहे. फाखरीजादेहच्या यांच्या हत्येच्या प्राथमिक तपासात इस्रायल सामील असल्याचा गंभीर पुरावा मिळाला आहे, असे ते म्हणाले.
इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांच्या आरोपावर इस्रायलने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अतिरेक्यांनी एका ज्येष्ठ इराणी शास्त्रज्ञाची हत्या केली. या हत्येमुळे इस्रायल युद्धासाठी उत्सुक आहे, असे दिसून येत आहे. हत्या करण्यात आलेल्या शास्त्रज्ञाचे नाव यापूर्वी बेंजामिन नेतान्याहू यांनी एका कार्यक्रमात घेतले होते, असे जरीफने यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
फाखरीजादेह यांची हत्या तेहरानजवळ झाली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला. त्यात ते गंभीर तो जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
२००३ पासून थांबवण्यात आलेल्या इराणच्या गुप्त अणुबॉम्ब कार्यक्रमाचे नेतृत्व फाखरीजादेह करीत होते, असा आरोप बर्याच कालावधीपासून होत आहे, पण इराणने अण्वस्त्रे बनवण्याच्या आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. आम्ही या हत्येचा जोरदार बदला घेऊ आणि या हत्येत सहभागी असलेल्यांना पश्चाताप करण्याची वेळ येईल, असे इराणचे सैन्य कमांडर हुसेन देहघन यांनी टि्वट केले आहे.
कुठल्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. इस्रायलनेही इराणच्या आरोपाला उत्तर दिलेले नाही. मोहसीन फाखरीजादेह यांना ‘द फादर ऑफ इराणी बॉम्ब’ असे संबोधले जायचे.