किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादल– इस्रायल सरकारचा धाडसी निर्णय,
– नैतिकतेचे धडे देऊ नका, जगाला सुनावले,
जेरुसलेम, (१२ ऑक्टोबर) – इस्रायलमध्ये घुसून हमासने घातलेला हैदोस गाझापट्टीतील सामान्यांना भोगावा लागत आहे. इस्रायलयने चारही बाजूने गाझापट्टीला घेरले असून, बॉम्बवर्षावाने भाजून काढले जात आहे. इस्रायलच्या अपहृत नागरिकांची सुटका होईपर्यंत गाझाला वीज-पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही. जगाने आम्हाला नैतिकतेचे धडे देऊ नये, असे इस्रायलने या मुद्यावर सुनावले आहे.
पॅलेस्टिनमधील हमासच्या दहशतवाद्यांनी मागील शनिवारी अचानक इस्रायलवर हल्ला चढवून नागरिक आणि सैनिकांची हत्या केली आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अपहरण केले. त्यानंतर पाच दिवसांपासून इस्रायल गाझापट्टीवर भीषण बॉम्बवर्षाव करीत आहे. इस्रायलने बॉम्बवर्षाव न थांबवल्यास अपहरण केलेल्या इस्रायलच्या एकेका नागरिकाला फासावर लटकावले जाईल, अशी धमकी हमासने दिली आहे. हमासच्या या धमकीचा कोणताही परिणाम इस्रायलवर झालेला नाही. गाझापट्टीवर सातत्याने हल्ले केले जात आहे. जोपर्यंत अपहृत नागरिक घरी परतत नाहीत, तोपर्यंत गाझाला वीज-पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही, असे इस्रायलचे ऊर्जामंत्री इस्रायल काट्झ यांनी स्पष्ट केेले आहे. गाझाला मानवी मदत देण्याबाबत जगभरात प्रश्न उपस्थित केला जात आहे. इस्रायली नागरिक घरी परतेपर्यंत गाझाला वीज-पाण्याचा पुरवठा केला जाणार नाही, असे काट्झ यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. मानवतेचा पुळका दाखवणार्यांवरही काट्झ बरसले. मानतावादासाठी मानवता असते. मात्र, आम्हाला कुणीही नैतिकतेचे धडे देऊ नये, अशा शब्दातही काट्झ यांनी सुनावले आहे.
हमास इसिसपेक्षाही महाघातक
हमास ही इसिसपेक्षा महाघातक दहशतवादी संघटना असल्याचे इस्रायल संरक्षण दलाने एक्सवर पोस्ट करीत म्हटले आहे. इस्रायल संरक्षण दलाने म्हटले की, हमास ही नरसंहार करणारी इसिसपेक्षाही महाघातक दहशतवादी संघटन आहे. इस्रायली मुले, महिला आणि पुरुषांची हत्या करताना हमासने इसिसचे झेंडे हातात घेतले असल्याचे इस्रायल संरक्षण दलाने म्हटले आहे.
हमास ही सुरुवात, आता जगभर हल्ले
इस्रायलवरील भीषणा हल्ल्यानंतर हमास दहशतवादी संघटनेच्या कमांडरने आता जगाला धमकी दिली आहे. हमास कमांडर महमूद अल-झहर याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. इस्रायल ही फक्त सुरुवात असून, आता जगभरात विविध ठिकाणी हल्ले होतील, अशी धमकी त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. आमचा कायदा जगभर लागू करू, असा धक्कादायक दावाही त्याने केला आहे.
हमासच्या प्रत्येक सदस्याचा मृत्यू निश्चित : नेतान्याहू
हमास कमांडरच्या या व्हायरल व्हिडीओनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी दहशतवादी संघटनेला इशारा देत, हमास संघटनेच्या प्रत्येक सदस्याचा मृत्यू निश्चित असल्याचे म्हटले आहे. हमास ही इसिसची दहशतवादी संघटना आहे आम्ही तिचा नाश करू, असे नेतान्याहू यांनी एका निवेदनातून स्पष्ट केले आहे.