किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादल– हमासला मोठा झटका,
तेल अविव, (११ ऑक्टोबर) – इस्रायलची लढाऊ विमानांवर नजर ठेवण्यासाठी हमासने लावलेली अॅडव्हॉन्स डिटेक्शन सिस्टिम इस्रायलच्या वायुदलाने उद्ध्वस्त केली. या यंत्रणेच्या माध्यमातून गाझापट्टीतून जाणार्या सर्व विमानांवर नजर ठेवणे हमासला शक्य होते. विमानांवर नजर ठेवण्यासाठी हमासने गाझापट्टीतील कित्येक इमारतींवर उच्च क्षमतेचे कॅमेरे लावले होते. या कॅमेर्यांवर ड्रोन, विमान किंवा उपग्रहांची नजर पडू नये म्हणून ते सौर पॅनल्सच्या खाली लपवून ठेवले जायचे. मात्र, इस्रायली हवाई हल्ल्यांमुळे हमासची नजर ठेवण्याची यंत्रणा पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे.
१० आणि ११ तारखेच्या रात्री केवळ ही यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी लढाऊ विमानांनी हल्ले केले, असे इस्रायलच्या वायुदलाने सांगितले. हमासच्या ट्रॅकिंग नेटवर्कचा शोध घेऊन त्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक इमारत उद्ध्वस्त केली. आता हमास आकाशात पाळत ठेवू शकणार नाही. संघटनेची ट्रॅकिंग यंत्रणा संपुष्टात आली असल्याचे इस्रायली वायुदलाने सांगितले. कित्येक ठिकाणी इस्रायलच रिमोटली पायलटेड एरियल व्हेइकल म्हणजे ड्रोनच्या मदतीने हल्ले करीत आहे. रात्री घुसखोरी करणार्या दहशतवाद्यांना शोधून मारले जात आहे. गाझापट्टीतील बीट हनौैन येथे रविवार व सोमवारच्या रात्री इस्रायली लढाऊ विमानांनी ८० ठिकाणांवर हल्ला केला. यात हमासला मदत करणार्या दोन बँकांचा समावेश आहे.
रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र युनिटच्या कमांडरचा खात्मा
इस्रायलच्या वायुदलाने हमासकडून वापरली जाणारे कित्येक भुयारे उद्ध्वस्त केली आहेत. हमासच्या दोन मोठ्या नेत्यांचा खात्मा केला. या व्यतिरिक्त इस्रायलने हमासचा कमांडर मोहम्मद ओसमैलचे घर उडवले आणि हमासच्या रणगाडाविरोधी युनिटच्या कमांडरचाही खात्मा केला. मिलिटरी कंपाऊंड आणि शस्त्रास्त्रांचा डेपोही इस्रायलने उडवला आहे.