|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » अफगाणिस्तानात भुकेमुळे पालकांवर मुलांना विकण्याची वेळ

अफगाणिस्तानात भुकेमुळे पालकांवर मुलांना विकण्याची वेळ

काबुल, १ जानेवारी – अफगाणिस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वी तालिबान्यांची राजवट प्रस्थापित झाल्यानंतर देशाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. दररोज जगायचे कसे, हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला असून, पोटापाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आता अनेक आई-बापांना आपल्या पोटच्या मुलांना बाजारात नेऊन विकण्याची वेळ आली आहे. अफगाणमध्ये स्थानिक नागरिकांच्या मदतीसाठी आलेल्या वर्ल्ड व्हिजन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संचालक असुंथा चार्ल्स यांनी याबाबतची माहिती प्रसिद्घ केली.
पश्‍चिम अफगाणमध्ये युद्धग्रस्त लोकांसाठी एक शिबिर उभारण्यात आले आहे. या शिबिरात मुलांच्या खरेदी-विक्रीचा बाजार जोरात सुरू असून, मुलांना विकणार्‍या पालकांची संख्या वाढतच आहे. खराब अर्थव्यवस्थेमुळे नवनवीन रोजगार निर्माण होत नाहीत आणि तालिबान्यांच्या जुलमी राजवटीखाली नोकरी करणेही शक्य नसल्याने केवळ पोट भरण्यासाठी अनेक सर्वसामान्यांवर आता घरातील लहान मुलांना बाजारात विकण्याची वेळ आली आहे. अफगाणमध्ये एखाद्या घरात खाणारी जास्त तोंडे असतील तर, त्या घरातील एखादी मुलगी विवाहाच्या निमित्ताने विकून, त्या पैशातून इतरांची पोट भरण्याचे काम अनेक कुटुंबे करीत आहेत. आता केवळ पैशाच्या मोहाने दहा वर्षाच्या मुलींचेही विवाह केले जात आहेत. म्हणजेच एक प्रकारे या मुलींची विक्री केली जात आहे. अशा घटना सध्या युद्धग्रस्त लोकांच्या शिबिरांमध्ये पाहायला मिळत असल्याची माहिती आहे. क्रूर राजवटीची पृष्ठभूमी असलेल्या तालिबान्यांसोबत संबंध न ठेवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणच्या मालमत्ता गोठवल्या आणि मदतही थांबवली. मात्र युद्ध, दुष्काळ आणि कोरोनासाथीच्या झळांमुळे आधीच उद्‌ध्वस्त झालेल्या अफगाणची यामुळे अधिकच अन्नान्नदशा झाली आहे.
देशाची जवळजवळ अर्धी लोकसंख्या भीषण अन्नटंचाईचा सामना करीत आहे.
दिवसेंदिवस अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकाधिक भीषण होत चालली असून, विशेषत: लहान मुलांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोटात चार कण पडावे म्हणून मुलांनाही विकायला तयार झालेली कुटुंबे पाहून जीव तुटत आहे, या शब्दांत वर्ल्ड व्हिजनच्या असुंथा चार्ल्स यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Posted by : | on : 2 Jan 2022
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g