किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलवर्णभेदाविरोधातील लढ्याचा नायक हरपला,
जोहान्सबर्ग, २६ डिसेंबर – आयुष्यभर वर्णभेदाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक, नोबल शांती पुरस्कार विजेते आणि आफ्रिकेचे माजी आर्चबिशप डेसमंड टूटू यांचे आज रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने एका संघर्ष युगाचा अंत झाल्याची भावना जगभरात व्यक्त केली जात आहे.
१९९०च्या दशकात डेसमंड टूटू यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वृद्धापकाळामुळे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने आज अखेर त्यांचे निधन झाले. डेसमंड टूटू यांच्या निधनावर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा यांनी शोक व्यक्त केला आहे. आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टूटू यांच्या निधनाने दक्षिण आफ्रिकेच्या लढवय्या आणि शूर पिढीचा अंत झाला आहे. त्यांनी वर्णभेदाविरोधात लढा देऊन आम्हाला एक नवीन दक्षिण आफ्रिका दिला. ते मानवाधिकाराविरोधात लढणारे युनिव्हर्सल चॅम्पियन होते, अशी शोक भावना रामफोसा यांनी व्यक्त केली आहे.
डेसमंड टूटू यांना दक्षिण आफ्रिकेत रंगभेद विरोधाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. त्यांनी नेहमी विवेकवादाची बाजू घेतली. रंगभेदाविरोधात अहिंसक लढा उभारल्याबद्दल त्यांना १९८४ मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
डेसमंड टूटू यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जगभरातील असंख्य लोकांसाठी ते प्रकाश होते. मानवी सन्मान आणि समानतेवर त्यांनी दिलेला भर कायम स्मरणात राहील, असे मोदी यांनी ट्विट केले.