किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकौरौ, २५ डिसेंबर – अंतराळातील प्रकाश पाहण्यासाठी आणि जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी जगातील सर्वांत मोठ्या आणि शक्तिशाली दुर्बिणीचे आज शनिवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. नासाच्या जेम्स वेब अंतराळ दुर्बिणीचे दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गयाना या अंतराळ केंद्रावरून अमेरिका, कॅनडा आणि युरोपातील अंतराळ संशोधन संस्थांनी यशस्वी प्रक्षेपण केले, अशी माहिती नासाने दिली.
१० अब्ज डॉलर्सच्या खर्चातून तयार करण्यात आलेली ही दुर्बिण १६ लाख किलोमीटर अंतरावर अंतराळात झेपावली आहे. चंद्राच्या तुलनेत हे अंतर चौपट आहे. निर्धारित ठिकाणी पोहोचण्यासाठी जेम्स वेब दुर्बिणीला महिनाभराचा कालावधी लागेल आणि त्यानंतर सक्रिय होण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ब्रह्मांडातील कित्येक रहस्ये उलगडण्यासाठी या दुर्बिणीची मदत होणार आहे.
सर्वप्रथम या दुर्बिणीचा प्रचंड मोठा आरसा आणि सनशिल्ड उघडणे आवश्यक आहे. रॉकेटच्या अग्रस्थानी असलेल्या शंकूमध्ये ते बसवण्यात आले आहे. अन्यथा ही दुर्बिण कार्यरत होऊ शकणार नाही. या माध्यमातून आपल्या विश्वाबद्दल आणि त्यामधील आपल्या स्थानाबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईल. आपण कोण आहोत, आपण काय आहोत, याचा शास्वत शोध घेतला जाणार आहे, असे नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते. तुम्हाला मोठे यश हवे असेल तर, मोठा धोकाही पत्करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.