किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकॅनबेरा, (२५ फेब्रुवारी ) – ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान समर्थक गटांकडून भारतीय प्रतिष्ठानांवर हल्ले सुरूच आहेत. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील वाणिज्य दूतावासात खलिस्तान समर्थकांनी खलिस्तानचा झेंडा फडकावला आहे. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात मंदिरांची तोडफोड केल्यानंतर आता ब्रिस्बेनमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून खलिस्तानी झेंडे फडकावण्यात आले आहेत. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रिस्बेन, क्वीन्सलँड येथील भारताच्या वाणिज्य दूत अर्चना सिंग यांना कार्यालयात खलिस्तानचा ध्वज सापडला.
ब्रिस्बेनच्या तारिंगा उपनगरातील स्वान रोडवर असलेल्या भारताच्या मानद वाणिज्य दूतावासाला २१ फेब्रुवारी २०२३ च्या रात्री खलिस्तान समर्थकांनी लक्ष्य केले होते. याप्रकरणी भारत सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी भारताने तक्रार दाखल केली आहे. क्वीन्सलँड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून ध्वज जप्त केला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिल्यानंतर ही घटना घडली आहे. जयशंकर यांनी त्यांच्या भेटीदरम्यान तेथील भारतीय समुदायाला लक्ष्य करणार्या ’कट्टरपंथी कारवायां’विरुद्ध सतर्कतेच्या गरजेवर भर दिला. ऑस्ट्रेलियातील हिंदू सातत्याने खलिस्तानींच्या निशाण्यावर आहेत. जानेवारी २०२३ मध्ये २० दिवसांच्या आत, ३ हिंदू मंदिरांची तोडफोड करताना, खलिस्तानींनी देशविरोधी आणि खलिस्तान समर्थक घोषणा लिहिल्या.
१२ जानेवारी रोजी खलिस्तानींनी हिंदू मंदिरावर पहिला हल्ला केला होता. हा हल्ला मेलबर्नच्या बी.ए.पी.एस
स्वामीनारायण मंदिर मध्ये घडले. मंदिराची तोडफोड केल्यानंतर खलिस्तानींनी मंदिराच्या भिंतीवर ’हिंदुस्तान मुर्दाबाद’, ’मोदी हिटलर है’ आणि ’भिंद्रनवाले झिंदाबाद’ अशा घोषणा लिहिल्या. यानंतर, १६ जानेवारी २०२३ रोजी मेलबर्नच्या कॅरम डाउन्समध्ये खलिस्तानी ऐतिहासिक श्री शिव विष्णू मंदिर श्री शिव विष्णू मंदिर) वर हल्ला झाला. तोडफोडीनंतर मंदिराच्या भिंतींवर ‘लक्ष्य मोदी’, मोदी हिटलर’ आणि ‘हिंदुस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या.