किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– लोकसंख्या वाढीसाठी नवनवीन ऑफर,
– नवविवाहित जोडप्यांना ३० दिवसांची सुटी,
बीजिंग, (२५ फेब्रुवारी ) – कधी काळी सर्वाधिक लोकसंख्येसाठी ओळखला जाणारा चीन आता घटलेल्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि लोकसंख्या वाढीसाठी चीन नवनवीन योजना आणि उपक्रम राबवताना दिसत आहे. चीनमधील तरुण पिढी विवाहाकडे पाठ फिरवत असताना, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी चीन सरकारने नवविवाहित जोडप्यांना विशेष वैवाहिक रजा देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, नवविवाहित जोडप्यांना ३० दिवसांची सुटी देण्यात येणार आहे. एका वृत्तानुसार, ही सुटी देण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की, अधिकाधिक तरुणांनी लग्न करावे आणि प्रजनन दर वाढवावा. घटती लोकसं‘या आणि कमी होत चाललेली तरुणांची संख्या यामुळे चीन सरकारसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी चीन सरकार तरुणांना लग्नासोबतच मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
चीनमध्ये २०२२ सालात गेल्या साठ वर्षांतील सर्वांत कमी लोकसंख्या नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षी चीनचा राष्ट्रीय जन्मदर कमालीचा घटल्याचे दिसून आले आणि या घसरत्या जन्मदरामुळे चीन सध्या म्हातार्यांचा देश बनला आहे. चीनमध्ये २०२२ मध्ये ९५ लाख मुलांचा जन्म झाला होता. २०२१ साली ही संख्या एक कोटी ६२ लाख इतकी होती. २०२२ साली चीनची लोकसंख्या ८ लाख ५० हजारांनी घटली आहे. २०२१ साली चीनची लोकसंख्या १४१ कोटी २६ लाख होती. तर, २०२२ साली लोकसं‘या कमी होऊन १४१ कोटी १८ लाखांवर आली. चीनमधील तरुणांची संख्या कमी झाल्याने याचा परिणाम थेट देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे.