किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकाठमांडू, २८ नोव्हेंबर – आमच्या देशातील आव्हाने आणि अंतर्गत समस्या हाताळण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. तिसर्या देशाच्या मदतीशिवाय आम्ही ती हाताळू शकतो, अशा शब्दांत नेपाळने चीनला ठणकावले आहे.
चीनचे राजदूत हू यांकी यांनी अलिकडेच नेपाळचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची भेट घेतली होती. याच भेटीत ओली यांनी चीनला स्पष्ट शब्दांत बजावताना, आमच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप न करण्याची ताकीद दिली होती.
पंतप्रधान ओली यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्यानंतर नेपाळमध्ये राजकीय भूकंप आला होता. माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांच्या पक्षाच्या दबावतंत्रामुळे ओली यांचा नेपाळ कम्युनिस्ट पार्टी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे ओली यांचे सरकारही अडचणीत आले आहे. भारत आणि चीन संबंधातील तणाव लक्षात घेऊन, ओली यांनी ही फूट टाळण्यासाठी चीनची मदत घेतली होती. मात्र, भारताशी वैर आपल्याला परवडणारे नाही, हे लक्षात आल्यानंतर ओली यांनी पुन्हा एकदा भारताशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लष्करप्रमुख जनरल नरवणे आणि परराष्ट्र व्यवहार सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्या नेपाळ दौर्यांना याच अनुषंगाने महत्त्व दिले जात आहे.
यांकी आणि ओली यांच्या भेटीत उपस्थित असलेल्या एका उच्चस्तरीय सूत्राच्या मते, यांकी यांनी जेव्हा ओली यांच्या सत्तारूढ आघाडीतील मतभेद सोडविण्यासाठी प्रस्ताव सुचविण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ओली यांनी त्यांना, आमच्या अंतर्गत समस्यांमध्ये तुमच्या हस्तक्षेपाची व सहकार्याची आवश्यकताच नसल्याचे स्पष्ट केले.
२०१८च्या निवडणुकीत ओली यांच्या पक्षाने संपूर्ण राष्ट्रीयवादी अजेंड्यावर प्रचार केला होता. यामुळेच त्यांना मोठा विजयही मिळाला होता. मात्र, चीनच्या दबावात येऊन ते यापासून दूर जात असल्याने, इतर घटक पक्ष संतापले होते. यातील बहुतांश पक्ष हे भारतसमर्थक असल्याचे ओली यांना पटले असल्यानेच ते आता पुन्हा एकदा चीनपासून दूर जात असल्याचे या सूत्राने सांगितले.
विशेष म्हणजे, चीनचे संरक्षण मंत्री जनरल वी फेंघे पुढील आठवड्यात नेपाळला भेट देण्याची शक्यता आहे. या भेटीत ते पुन्हा एकदा ओली यांच्यावर दबाव टाकण्याची शक्यता असली, तरी आता कुठल्याही स्थितीत भारताविरोधात भूमिका न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याची माहिती आहे.