किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, २९ नोव्हेंबर – तणाव कायम असतानाही, चीनच्या सैनिकांकडून लडाख सीमेवर बांधकाम सुरूच आहे. एकीकडे शांततेची भाषा बोलून दुसरीकडे भारताला चिथावण्याचा हा प्रकार असल्याची माहिती डेमॉकॅ्रटिक पार्टीचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी दिली.
दक्षिण चीन समुद्रात चीन ज्या प्रकारे वागत असतो, तोच व्यवहार हा देश लडाख सीमेवरही करीत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, लडाखमध्ये चीन एकप्रकारे युद्धाचीच तयारी करीत आहे. या देशाला शांतता मान्यच नाही. माझे वृत्त खरे असेल, तर नजीकच्या भविष्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये आणखी एका मोठ्या संघर्षाची शक्यता नाकारता येणार नाही, असे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.
सीमेवरील ‘जैसे थे’ स्थिती बदलण्याचा प्रयत्न चीन सातत्याने करीत आहे. दक्षिण चीन समुद्रातही त्यांनी असेच केले होते. आपले स्वत:चे बेट उभारले, याचा त्रास इतर देशांना सहन करावा लागत आहे. आता भारतही सीमेवर हाच त्रास सहन करीत आहे, असे ते म्हणाले.
चीनचा अहंकार वाढत असून, विस्तारवादी प्रवृत्तीने या देशाला ग्रासले आहे. नेपाळ आणि भूतान हे देशही चीनचे शिकार ठरले आहेत. लहान देश असल्याने, चीनचा विरोध करण्याचे धाडस त्यांच्यात नाही. मात्र, भारताने चीनला वारंवार शह दिला आहे. सध्या सीमेवर शांतता दिसत असली, तरी प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. तणाव अजूनही कायम असून, दोन्ही देश सैन्य आणि शस्त्रांची जमवाजमव करीत आहे. या स्थितीवर तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.