किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलअमिरातने व्हिसा देण्यावर घातले निर्बंध
दोहा, २९ नोव्हेंबर – संयुक्त अरब अमिरातने व्हिसा जारी करण्यावर निर्बंध घातल्याने, सुमारे तीन हजार पाकिस्तानी लोकांना एका क्षणात बेरोजगार व्हावे लागले आहे. सुरुवातीला ही व्हिसाबंदी फक्त पर्यटन क्षेत्रासाठीच होती, पण आता त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
अमितरातने एकूण १३ देशांच्या नागरिकांना व्हिसा नाकारला आहे. यात इराण, सीरिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या मुस्लिम देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्वच देश इस्रायलच्या विरोधात असून, त्याचीच किंमत त्यांना आता मोजावी लागत आहे. रोजगार आणि सेवा क्षेत्रातही व्हिसाबंदीचा निर्णय अमिरातने १८ नोव्हेंबर रोजी जारी केला. याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानला बसला. आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानात तशाही नोकर्या मिळत नसल्याने बहुतांश लोक अमिरातसारख्या देशांमध्ये रोजगाराच्या शोधात जात असतात. आता तिथेही त्यांच्यावर बेकारीचे संकट ओढवले आहे.
सूत्रांच्या मते, आगामी काळात पाकिस्तानला आणखी मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. एका प्रमुख दैनिकाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातून मागील वर्षी दोन लाखांवर युवक अमिरातमध्ये नोकरीसाठी आले होते. यावर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर ५१ हजार लोकांनी पाकिस्तानातून पलायन केले होते.
इस्रायलला मान्यता नाही म्हणून
संयुक्त अरब अमिरातसोबतचे संबंध सुरळीत होण्यापूर्वीच, इस्रायलला स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. त्यांची ही भूमिका आजही कायम आहे. आणखीही काही मुस्लिम देश इस्रायलला स्वतंत्र देश मानण्यास तयार नाहीत. याचीच किंमत आता या देशांना भोगावी लागत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. अशा देशांना आम्ही आता कठोर संदेश देणार असल्याचे अमिरातने स्पष्ट केले आहे.