किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– ३ हजार नोकर्या धोक्यात,
लंडन, (२४ जानेवारी) – वेल्स, इंग्लंड येथील पोर्ट टॅलबोट स्टील प्लांट बंद करण्याच्या टाटा समूहाच्या निर्णयानंतर पोलाद उद्योगात खळबळ उडाली आहे. एकीकडे टाटांच्या या निर्णयामुळे या पोलाद युनिटमध्ये काम करणार्या ५० हजार कामगारांच्या नोकर्या धोक्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे यू.के. स्टीलचे मोठे संकट येण्याचाही धोका आहे. वास्तविक, पोर्ट टॅलबोट येथे असलेला हा टाटा प्लांट हा ब्लास्ट फर्नेस प्लांट आहे, ज्यामध्ये कोळशाच्या मदतीने कच्चा माल वितळवून स्टील तयार केले जाते आणि जर टाटाने हा प्लांट बंद केला तर जी-२० देशांमध्ये फक्त इंग्लंड एक असा देश असेल जिथे स्टील कच्च्या मालापासून तयार होणार नाही.
टाटा यूके स्टील उत्पादनासाठी पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित पर्यायांचा विचार करत आहे. या प्रक्रियेसाठी खूप कमी कामगार आवश्यक आहेत. टाटा ग्रुप या संदर्भात टाटा अधिकारी आणि कामगार संघटनेच्या कर्मचार्यांमध्ये लंडनमध्ये बैठकही झाली आहे, टाटाने अद्याप हा प्लांट बंद करण्याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी प्रशासनाला आपल्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
६५११ कोटींचे नुकसान झाल्यानंतर प्लांट बंद करण्याचा निर्णय
वास्तविक टाटाच्या यू.के. या प्लांटच्या ऑपरेशनद्वारे कंपनीला आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत ६५११ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, या तोट्यात ६३५८ कोटी रुपयांचा मोठा वाटा आहे. या प्रकल्पाच्या डीकार्बोनायझेशनसाठी हे शुल्क आकारण्यात आले आहे. कंपनीने इलेक्ट्रिक आर्क इंडक्शनवर आधारित प्रकल्पाचे विश्लेषण केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्टील निर्मितीचा खर्च कमी होईल आणि प्रदूषणही टाळता येईल.
टाटा समूहाने निर्णयाचा पुनर्विचार करावा: स्टीफन किनॉक
दरम्यान, मजूर पक्षाचे एम.पी. स्टीफन किनोक यांनी टाटा यांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याचे आवाहन केले आहे आणि कामगार संघटनांशी या प्रकरणी पुन्हा वाटाघाटी कराव्यात. या ३००० नोकर्या निर्माण करण्यासाठी सरकारने टाटा स्टीलला ५०० दशलक्ष पौंडांची मदत दिली होती आणि अशा पद्धतीने प्लांट बंद करण्याचा टाटांचा निर्णय योग्य नाही, असे ते म्हणाले.
सुनक प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करा: मार्क ड्रेकफोर्ड
दरम्यान, वेल्सचे फर्स्ट मिनिस्टर मार्क ड्रेकफोर्ड यांनी याप्रकरणी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून त्यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. वेल्समधील स्टील प्लांट अशाप्रकारे बंद केल्यास ब्रिटनला मोठा धक्का बसेल, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी लवकरात लवकर या विषयावर चर्चा करण्यासाठी मी वेळ मागितला आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=59948