किमान तापमान : 26.24° से.
कमाल तापमान : 26.73° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 34 %
वायू वेग : 3.57 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.9°से. - 28.9°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.38°से. - 29.21°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.06°से. - 28.27°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल22.98°से. - 28.14°से.
रविवार, 01 डिसेंबर साफ आकाश23.62°से. - 27.95°से.
सोमवार, 02 डिसेंबर घनघोर बादल23.55°से. - 27.34°से.
मंगळवार, 03 डिसेंबर टूटे हुए बादलरोम, (१३ डिसेंबर) – भारतीय मनोरंजन विश्वातील उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेते कबीर बेदी यांनी आजवर विविध चित्रपटांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले. नुकताच कबीर बेदी यांना इटलीतील सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोर झालेल्या एका समारंभात कबीर बेदी यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक’ (मेरिटो डेला रिपब्लिका इटालियाना) या उच्च दर्जाच्या इटालियन नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कबीर बेदी म्हणाले, ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीचा सर्वोच्च सन्मान माझ्यासाठी खूप भावनिक पुरस्कार आहे. त्यांनी मला १२ वर्षांपूर्वी दिलेल्या कॅव्हॅलियर (नाईट) पेक्षाही हा सर्वोच्च सन्मान दिला. या सन्मानाबद्दल पंतप्रधान मेलोनी आणि मला खूप आनंद झाला. इटलीचे कौन्सुल जनरल अॅलेसँड्रो डी मासी म्हणाले, गेली अनेक वर्षे कबीर भारत आणि इटली यांच्यातील संबंध वाढविण्यासाठी चांगली भूमिका बजावत आहेत. त्यांची लोकप्रियता इटालियनच्या सर्व पिढ्यांमध्ये पसरलेली आहे. त्यामुळेच इटलीच्या राष्ट्रपतींनी त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सन्मान देण्याचा निर्णय घेतला. कबीर आमच्या सर्व इटालियन लोकांसाठी खूप खास आहे. कबीर हा इटलीचा खरा मित्र आहे आणि त्याचे इटलीशी घट्ट नाते आहे.