किमान तापमान : 27.07° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 33 %
वायू वेग : 3.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
24.56°से. - 31.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 27.77°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 28.69°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.61°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.44°से. - 28.39°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.18°से. - 28.76°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल– चीनचे कट्टर विरोधक,
ब्युनोस, (१३ डिसेंबर) – उदारमतवादी अर्थशास्त्रज्ञ जेव्हियर मिलेई यांनी अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. अर्जेंटिना अध्यक्षपद निवडणुकीत उजव्या विचारसरणीचे, पुरोगामी नेते अशी ओळख असणार्या मिलेई यांनी बाजी मारली होती.
मिलेई यांचे प्रतिस्पर्धी सर्जिओ मास्सा यांनी आपला पराभव मान्य केला होता. सध्या अर्जेटिना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत आहे. आता देशाला आर्थिक स्थिरता प्रदान करण्याचे मोठे आव्हान मिलेई यांच्यासमोर असणार आहे. मिलेई यांचा कार्यकाळ चार वर्षांचा असणार आहे. मिलेई हे स्वत: अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत. यांच्या विजयाचे अर्जेंटिनावर दुरगामी परिणाम होतील, असे देशातील राजकीय विश्लेषक मानत आहेत. लिथियम आणि हायड्रोकार्बन्सच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. मिलेई यांनी चीन आणि ब्राझील सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. ते कम्युनिस्ट सरकारबरोबर कोणतेही व्यवहार करणार नाहीत, तर अमेरिकेबरोबर देशाचे संबंध अधिक सदृढ करतील, असे मानले जात आहे.