|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इम्रान खानला पाकिस्तान लष्कराचा झटका!

इम्रान खानला पाकिस्तान लष्कराचा झटका!

-इम्रान खानला एक दिवसाचा दिलासा,
-कारवाई न करण्याचा न्यायालयाचा आदेश,
इस्लामाबाद, (१५ मार्च) – इम्रान खानवर अटकेची टांगती तलवार असताना त्यांना पाकिस्तानी लष्कराकडूनही दणका बसला आहे. पाकिस्तानच्या लष्कराने निवडणुकीत सैनिक तैनात करण्यास नकार दिला आहे. संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, देशातील सीमेवर परिस्थिती चांगली नाही, अशा परिस्थितीत निवडणुकीच्या वेळी लष्कराचे जवान तैनात करता येणार नाहीत. पाकिस्तानमध्ये लवकर निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या इम्रान यांच्या पक्ष पीटीआयला हा मोठा धक्का मानला जात आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी निवडणूक आयोगाला सांगितले की, देशातील सध्याची परिस्थिती पाहता निवडणुकीत सैन्य तैनात करता येणार नाही. सीमा आणि देशाची सुरक्षा ही लष्कराची पहिली प्राथमिकता असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा विधानसभांमध्ये निवडणूक आयोगाची बैठक झाली. त्यात मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा, संरक्षण सचिव लेफ्टनंट जनरल हमूद उझ जमान खान, अतिरिक्त संरक्षण सचिव मेजर जनरल खुर्रम सरफराज खान उपस्थित होते. यादरम्यान संरक्षण मंत्रालयाकडून आयोगाला देशातील सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवादी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर देशभरात दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत आहे. बैठकीत संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला सीमेवरील परिस्थिती आणि लष्कराच्या तैनाती तसेच देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. अधिका-यांनी आयोगाला सांगितले की सैन्य आपल्या प्राथमिक कर्तव्यांना महत्त्व देते आणि सीमा आणि देशाची सुरक्षा ही त्यांची पहिली प्राथमिकता आहे. देशातील सध्याच्या परिस्थितीमुळे पाकिस्तानी लष्कर सध्या निवडणूक कर्तव्यासाठी उपलब्ध नाही.
इम्रान खानला एक दिवसाचा दिलासा
लाहोर – माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांना गुरुवारपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा आदेश न्यायालयाने पोलिसांना दिला. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरावर धडक देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, इम्रान त्यांच्या समर्थकांचा वापर ढालीप्रमाणे करीत असून, पोलिस व त्यांच्या समर्थकांमध्ये संघर्ष झाला. त्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला.
पोलिस कारवाईला तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही कारवाई संपुष्टात आणण्याचा निर्देश सरकारला द्यावा, अशी विनंती याचिकेत केली आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत थांबवण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. पीटीआयचे नेते फवाद चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. तारिक सलीम शेख यांनी उपरोक्त आदेश दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. यापूर्वी पंजाबचे पोलिस महानिरीक्षक, मुख्य सचिव आणि इस्लामाबाद पोलिसांना दुपारी तीन वाजेपर्यंत हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.
पोलिस इम्रान खान समर्थकांत हाणामारी
इस्लामाबाद पोलिसांनी मंगळवारी इम्रान खान यांच्या जमान पार्क निवासस्थानाबाहेर जमलेल्या पीटीआय कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिस आणि पीटीआय समर्थकांमध्ये हाणामारीही झाली. यात पोलिसांसह काही कार्यकर्ते जखमी झाले.

Posted by : | on : 16 Mar 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g