|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया » इम्रान खानसह पीटीआयचे ८० नेते नो-फ्लाय लिस्टमध्ये!

इम्रान खानसह पीटीआयचे ८० नेते नो-फ्लाय लिस्टमध्ये!

इस्लामाबाद, (२५ मे) – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. इम्रानसह पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या ८० सदस्यांचाही नो-फ्लाय लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. इम्रानची पत्नी बुशरा बीबी हिलाही देश सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. इम्रान खान यांनी अनेक प्रांतांमध्ये कलम २४५ लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याला अघोषित मार्शल लॉ म्हटले आहे.
पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम २४५ अंतर्गत, देशाच्या रक्षणासाठी सैन्य तैनात केले जाते. पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि इस्लामाबादमध्ये कलम २४५ लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात इम्रानने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.लष्कर कायदा १९५२ अंतर्गत नागरिकांची अटक, तपास आणि खटला घटनाबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे इम्रानने याचिकेत म्हटले आहे.पीटीआय सदस्यांवर पक्ष सोडण्यासाठी दबाव आणणे हे घटनेच्या कलम १७ अन्वये घटनाबाह्य आहे. यासोबतच ९ मे रोजी देशात उसळलेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. वृत्तानुसार, याचिकेत इम्रान खान यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ, पीएमएन-एन सुप्रीमो नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज, माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी, जेयूआय-एफ प्रमुख मौलाना फजलुर रहमान आणि इतरांवर आरोप केले आहेत.
पीटीआय नेत्यांचे राजीनामे
पाकिस्तानमध्ये ९ मे रोजी झालेल्या हिंसाचारानंतर इम्रान यांच्या पक्ष पीटीआयच्या सुमारे दोन डझन नेत्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणार्‍या नेत्यांमध्ये डॉ. शिरीन मजारी, फैयाझुल हसन चौहान, मलिक अमीन अस्लम, मेहमूद मौलवी, अमीर कयानी, जय प्रकाश, आफताब सिद्दीकी आणि संजय गंगवानी यांचा समावेश आहे. याशिवाय सरदार तन्वीर इलियास, बिलाल गफ्फार, करीम गबोल, मलिक जवाद, बलुचिस्तानचे खनिज मंत्री मुबीन खिलजी, मेजर ताहिर सादिक आणि मुलगी इमान ताहिर, मलिक अमीन अस्लम, सय्यद जुल्फिकार अली शाह यांनीही गेल्या काही दिवसांत राजीनामे दिले आहेत.

Posted by : | on : 25 May 2023
Filed under : आंतरराष्ट्रीय, आशिया
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g